
अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवा-मा.आ.हरिदास भदे.
कोविड रुग्णांसाठी अॅटिजेन टेस्टचे प्रमाण वाढवण्यात यावे अशी मागणी मा.आ.हरिदास भदे यांनी केली आहे.
शहरात व जिल्ह्यात कोविद-19 चे रुग्ण वाढत आहेत.या अनुषंगाने संसर्ग टाळून रुग्णांची संख्या घटवण्यासाठी तपासण्यांचा वेग वाढला पाहिजे ,मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब वगैरे सारखे आजार असलेल्या रुग्णांची अॅटिजेन टेस्ट मोठ्या प्रमाणावर घेण्यात याव्यात असे पत्र त्यांनी जिल्हा प्रशासनाला नुकतेच दिले.
मागील आठवड्यात मा.आरोग्य मंत्री श्री.राजेशजी टोपे यांची मंत्रालयात भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील परिस्थिती मा.हरिदास भदे यांनी अवगत केली होती.