💐दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐

शैक्षणिक आयुष्यातील पहिली पायरी म्हणून संबोधल्या गेलेल्या दहावी परीक्षेचा आज निकाल घोषित झाला आहे.अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जिवनाचे स्वप्न असते,नवीन काॅलेज,नवीन मित्र,शाळे सारखी युनिफॉर्म घालन्याची जबाबदारी नाही व अजून बरेच काही स्वातंत्र्य मिळण्याची ओढ विद्यार्थ्यांना लागलेली असते.
या दहावी नंतर लगबग सुरू होते ती महाविद्यालयीन प्रवेशाची.सायन्स, घ्यायचे की आर्ट, काॅमर्स, तालुक्याला शिकायचे की जिल्ह्याच्या ठिकाणी असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना व पालकांना पडलेले असतात. सायन्स घेणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांचे अकरावी चे क्लासेस सुद्धा सुरु झाले आहेत.
दिवसेंदिवस गुणांची टक्के वारी वाढतच आहे.जुन्या काळी फर्स्ट क्लास मध्ये पास होणे म्हणजे 60टक्के गुण मिळवणे प्रतिष्ठेचे होते व डिस्टीन्कशन म्हणजे 75 टक्के गुण मिळवणे हा लौकिक होता आता फर्स्ट क्लास व डिस्टीन्कशन याला फारसे आकर्षण राहले नाही.तसा अकरावी प्रवेशा शिवाय दहावीच्या गुणांना विशेष महत्त्व सुद्धा राहले नाही परंतु आयुष्यातील पहिली बोर्डाची परीक्षा म्हणून विद्यार्थ्यांना व पालकांना दहावीचा थोडा धसका असतोच आणि तोच दहावीचा निकाल आज घोषित झाला आहे.
💐सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐

(Maharashtra SSC Results 2020 Declared) निकाल जाहीर झाला आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 17 लाख विद्यार्थ्यांची उत्सुकता संपली आहे. राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. मागच्या 15 वर्षांतला हा सर्वाधिक निकाल असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत.

या निकालात तब्बल 242 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 242 पैकी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी फक्त लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल जरी सर्वधिक असला तरी 100 टक्के गुण मिळवणारे 151 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. यात नाशिक विभागातील एकही विद्यार्थी नसून फक्त 2 विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत.2017 साली 193 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर 2018 साली 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. तर गेल्यावर्षी केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते.

मागच्या वर्षीपेक्षा यंदा खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. यंदा राज्याचा निकाल 95.30 टक्के एवढा लागला आहे. अंतर्गत मूल्यमापन, तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला असल्याचं शकुंतला काळे यांनी सांगितलं आहे.

यंदाही निकालात मुलींची बाजी, 96.91 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर, निकालात कोकण विभाग अव्वल, तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी राज्यातील विभागनिहाय निकालाची टक्केवारी : पुणे : 97.34 टक्के, नागपूर : 93.84 टक्के, औरंगाबाद : 92 टक्के, मुंबई : 96.72 टक्के, कोल्हापूर : 97.64 टक्के, अमरावती : 95.14 टक्के, नाशिक : 93.73 टक्के, लातूर : 93.09 टक्के, कोकण : 98.77 टक्के

दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी, तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी

दहावीचा निकाल जाहीर, पुणे विभागाचा 97.34 टक्के निकाल, तर मुंबईचा निकाल 96.72 टक्के

दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल असून कोकणाचा 98.77 टक्के एवढा निकाल लागला आहे.

राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के एवढा लागला आहे. यंदाच्या वर्षीही विद्यार्थिनींनी मारली बाजी.

महाराष्ट्र, शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *