मुर्तिजापूर येथे अण्णाभाउ साठे यांची जयंती साजरी-प्रा.एल.डी.सरोदे.

थोर विचारवंत अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मुर्तिजापूर प्रतिनिधी
थोर विचारवंत अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुतिजापूर तालुक्यातील सर्व समाजबांधवांनी अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात केले.अण्णा भाऊ साठे,थोर विचारवंत,महान साहित्यिक, क्रांतीकारक होते, त्यांच्यावर मार्क्स, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता, साम्यवादी विचारसरणीचा पगडा होता, अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला,हा काळ इंग्रजी राजवटीचा काळ होता, अण्णा भाऊ साठे यांनी गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खूप मोठा लढा उभारला होता, त्यांनी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठाव केला, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना लुटणारे सावकाराविरूद्ध आंदोलन सुरू केले होते त्यांनी आपल्या साहित्यातून अनेक पात्रं क्रांतीकारक दाखविली आहेत,वारणेचा वाघ, फकीरा , अनेक कादंबऱ्या लिहिल्या,कथा लिहिल्या, पोवाडे गायले, म्हणूनच अण्णा भाऊ साठे यांना साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशा थोर विचारवंत, महान साहित्यिक, यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुर्तिजापूर येथील पालिकेच्या मार्केटमध्ये अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अरुणराव थोरात , महादेवराव इंगोले, वासुदेवराव धुरदेव,सुरेश गायकवाड, रविंद्र गायकवाड,सुनील खंडारे,प्रा एल डी सरोदे,कु.आस्था थोरात,दिपक खंडारे, गोपाल गायकवाड,विजय खंडारे,प्रकाश खंडारे,अनील धुरदेव धीरज गायकवाड यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले प्रा एल डी सरोदे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा परीचय करून दिला .

जयंती., मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *