आरोग्यमत्री राजेश टोपे यांना मातृशोक

गेली ४ महिने महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती जवळून पाहणाऱ्या आणि त्या परिस्थितीशी झुंजायला राज्यातील कोविड योध्यांना प्रेरणा देणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्रींचं – शारदा टोपे यांचं आज, शनिवारी रात्री उशिरा निधन झालं आहे. त्या ७४ वर्षांच्या होत्या. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २ ऑगस्ट, रविवार रोजी पार्थपूर, तालुका अंबड, जिल्हा जालना येथे सायंकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

कोरोना संकट सुरु झालं तेव्हापासूनच त्या त्यांच्या शारीरिक व्याधींशी झुंज देत होत्या.

मधील काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली होती. आज मात्र त्यांची जीवनासोबत सुरु असलेली झुंज संपली. शारदाताई या राष्ट्रवादीचे माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Nidhan Varta, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *