
🌳लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी निमित्त वृक्षारोपण 🌳मुर्तिजापूर प्रतिनिधी
मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू नजीक बोंडे ग्रामपंचायत च्या वतीने संपूर्ण गावात लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, शेलू नजीक बोंडे गावचे सरपंच महादेवराव खांडेकर, यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य प्रा एल डी सरोदे, सौ मंदाताई सरोदे, सौ शोभाताई बोंडे, शंकरराव वाघमारे सौ शिलाताई खांडेकर, दशरथ घोसले, यांच्या हस्ते वृक्ष रोपनाचा कायैक्रम घेण्यात आला, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे ह्या तुकारामांच्या अभंगानुरूप आज वृक्षाचे महत्व समजायला लागले वृक्ष आम्हाला आयुष्यभर देण्याचाच काम करीत असताना आपण वृक्ष संगोपनाची जवाबदारी स्वीकारली पाहीजे, गाव स्वच्छ, सुंदर आणि विकासाच्या दृष्टीने गावात प्रत्येक गावच्या नागरिकांनी एक वृक्ष लावावा लागणार आहे हे महत्व आहे म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी निमित्त वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गावातील नागरीक उपस्थित रमेशभाऊ गायकवाड, नाजुकभाऊ थोरात, राजेंद्र सरोदे, निखिल बोंडे, गोपाल मोहोड, सिद्धार्थ खांडेकर, कु राणी खांडेकर, छोटू बोंडे, निलेशभाऊ सरोदे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत शेलू नजीक बोंडे गावात भव्य वुक्षरोपणाचा कायैक्रम पार पडला🌳🌳🌳🌳🌳🌳
माहिती संकलन-प्रा.एल.डी.सरोदे,पत्रकार, दै.मातृभूमी