कोरोना योद्धा रतन हिरे करत आहेत समाजप्रबोधन.

🌹कोरोना विरुद्धच्या लढाईत खारीचा वाटा🌹
नाशिक शहरात व जिल्ह्यात कोरोनाचे पेशंट दररोज वाढतच आहेत.महानगरपालिका व शासकीय यंत्रना आपल्या परीने लढत आहे.या महामारी विरुध्दच्या लढाईत श्री.रतन हिरे यांच्या सारखे स्वयंसेवक कुठलीही प्रसिद्धी न करता परिसरातील नागरिकांना आपल्या पद्धतीने सेवा देत आहेत, प्रबोधन करत आहेत.ऑक्सीमिटर व थर्मल स्कॅनर घेऊन सोप्या टेस्ट करुन त्यांना जागृत करत आहेत जेणे करून ही कोरोना साखळी तोडण्यास मदत होईल.
श्री.रतन हिरे हे कुठल्याही शासकीय मदती शिवाय एक सामाजिक कार्य म्हणून हे काम करत आहेत व त्यांच्या या कामा बद्दल त्यांचे सर्व नागरिकांकडून व मित्रमंडळी कडून कौतुक होत आहे.
✍️ विनायक काळदाते, सौ.संगिताताई पाटील, अरुणदादा शिरोळे, ज्ञानेश्वर ढेपले व मित्रमंडळ.

नाशिक, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *