
मुंबई करांनो सुरक्षित रहा सुरक्षित घरी जा💧💧💧💧💧💧💧💧💧💦💧💧💦💦💦💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧 सिएसटी :बुधवार दिनांक 5/8/20 : आज पावसाचा सतत तिसरा दिवस दुपारी २ते सायंकाळी ६:५० पर्यंत भंयकर मुसळधार पाऊस. सुं सुं वार्याचा भंयकर आवाज.पावसात छत्री उघडण्यापूर्वीच तुटुन जात होती. आमच्या रूग्णालयातील प्रशिक्षण महाविद्यालयातील खिडकीची काच वार्याच्या दाबानी अक्षरशः फुटली. आवारातील सर्व मोठ्या झाडाखाली वार्याने फांद्या पाने जडून गेली आहेत. कार्यालयातून ३र्या मजल्यावरून सिएसटी स्टेशन कडे पाहिले तर प्रचंड आवाज करून पत्रे उडत होते. तरीही मुंबई कर जिव वाचवून घरी जाण्यासाठी धडफडत होते. अनेक व्रुक्ष कोसळत आहेत. मुंबई करांनी घरी जाण्या पेक्षा जिव वाचवावा व जिव वाचल्यानंतर च घरी जावे. आहे तेथेच सुरक्षित ठिकाणी थांबावे जिव धोक्यात घालून पळत सुटू नये. प्रवास करणारे जास्तीत जास्त लोक आपत्कालीन आरोग्य सेवेतील कर्मचारी आहेत. सुरक्षित रहा सुरक्षितच घरी जा. घरी तुमची वाट पहात आहेत. काही अडचणीत असाल तर फोन करा मुंबई पोलीस १००. प्रा.अभिमन्यू टकले 💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧