
राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी सेलच्या अकाेला महानगराध्यक्ष पदी गणेशराव इंगाेले
अकाेला ः राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी सेलच्या अकाेला महानगराध्यक्ष पदी गणेशराव इंगाेले यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठाेड यांनी इंगाेले यांची निवड केली आहे.
जिल्ह्यातील सामाजीक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून गणेशराव इंगाेले हे अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व्हीजीएनटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हिरालाल राठाेड यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी सेलच्या अकाेला महानगराध्यक्ष पदावर त्यांची निवड केली आहे. पक्षाची ध्येय, धाेरणे आणि व्हीजेएनटीसह सर्व समाजघटकांना न्याय मिळवून देऊन त्यांच्या सामाजीक, शैक्षणिक, आर्थिक उत्थानासाठी यापुढे कार्य करावे, अशी अपेक्षा हिरालाल राठाेड यांनी व्यक्त केली आहे. गणेशराव इंगाेले यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अकोला जिल्हा व अकोला महानगर पदाधिकारी व भटक्या विमुक्त जातीचे कार्यकर्त्यांना दिले आहे.