
🌹समाजबांधवांकडून महसूल अधिकारी श्री.अण्णा काळे यांचा सत्कार🌹
मा.जिल्हाधिकारी नाशिक यांचे स्विय सहाय्यक व कलेक्टर ऑफिस नाशिक मधील समाजाचे मार्गदर्शक अधिकारी श्री.अण्णा काळे यांची शासनाने उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून निवड केली ,त्या निमित्ताने धनगर समाजातर्फे मा.काळे साहेबांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी समाजाचे जेष्ठ नेते खंडेराव पाटील, सौ.संगिताताई पाटील, विनायक काळदाते, सदाशिव वाघ,रतन हिरे उपस्थित होते.
मा.काळे साहेबांनी सत्काराला उत्तर देताना समाजाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा सल्ला दिला तसेच काही अडचणी आल्यास मदतीचे आश्वासन सुद्धा दिले.