
मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक
हा प्रवास प्रेरणादायी
पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असून वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजता आणि वाचता येणारे वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते. १९९४ मध्ये मुंबई चौफेर नावाचे सायं दैनिक सुरू केले. यानंतर दैनिक आपला वार्ताहर, दैनिक यशोभुमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ १९९९ मध्ये रोवली. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक/ संस्थापक हा प्रवास थक्क करणारा असून त्यांनी या क्षेत्रात केलेले काम कायम स्मरणात राहील.
त्यांच्या कुटुंबीयाच्या दुःखात सहभागी असुन या दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती प्रदान करावी, अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आहे.
मुरलीधर बाबा शिंगोटे यांना पुनश्च एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आहे प्रा.डाॅ अभिमन्यू टकले