प्रा.एल.डी.सरोदे यांची राष्ट्रवादी काॅग्रेस मुर्तिजापूर तालुका विमुक्त व भटक्या जमाती सेल तालुका अध्यक्ष पदी  निवड.

🌹प्रा.एल.डी.सरोदे यांची राष्ट्रवादी काॅग्रेस व्ही.जे.एन.टी.(विमुक्त व भटक्या जमाती) सेल मुर्तिजापूर तालुका अध्यक्षपदी नेमणूक🌹
प्रा.एल.डी.सरोदे यांची राष्ट्रवादी काॅग्रेसच्या विमुक्त व भटक्या जमाती सेलच्या मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.
प्रा.सरोदे हे पत्रकार असून उच्च शिक्षित आहेत, मागील दहा बारा वर्षांपासून समाजप्रबोनाचे काम करत आहेत.आपल्या लेखनामुळे उभ्या महाराष्ट्रात पोहचलेले प्रा.सरोदे दै.मातृभूमीचे वार्ताहर सुद्धा आहेत व त्यांचे प्रबोधनपर लेख सोशलमेडीयावर आणि प्रिंट मेडीयावर झळकत असतात.
मा.आ.हरिदासजी भदे यांचे कट्टर समर्थक असलेले प्रा.सरोदे यांचे मुर्तिजापूर तालुक्यात सुद्धा बाराबलुतेदार व अठरापगड जातीसाठी कामकाज सुरु असते.सोबतच शेतकऱ्यांच्या व ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना ते वाचा फोडत असतात. तालुक्यात कापूस खरेदी केद्र सुरु करणे,हरभरा खरेदीमधील अनियमितता, बियाण्याची कमतरता अशा अनेक विषयावर त्यांनी मागील काळात समाज उपयोगी काम केले आहे.दि.31मे 2020 रोजी त्यांच्या पुढाकाराने मुर्तिजापूर येथे भव्य रक्तदान शिबीर सुद्धा झाले.
प्रा.सरोदे यांच्या निवडीमुळे तालुक्यातील भटके विमुक्तांचे संघटन व पक्ष संघटन मजबूत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

अकोला, निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *