
मा.हरिदासजी भदे यांच्या पाठपुराव्याला यश 👌💐
दिनांक 22 जुलै रोजी मा.आ.हरिदासजी भदे यांच्या सोबत मंत्रालयात जाण्याचा योग आला. बहुजन समाजातील कर्मचाऱ्यांच्या समस्या मा.ना.भुजबळ साहेबांकडे मांडल्यानतर वनविभाग व पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालयात गेलो.
मा.पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्र्याना मेंढपाळांना चार महिन्यासाठी मिळणाऱ्या चारा तगाईचा व वनविभागाकडे कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळांची प्रलंबित असलेली नुकसान भरपाई बद्दल निवेदन दिले ,पाठपुरावा केला.
पाठपुराव्याला दोन्ही विभागाने सकारात्मक प्रतिसाद देत मेंढपाळांसाठी नहू जिल्ह्यात जुन ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी रु.6000 प्रती महिना असलेली नुकसानभरपाई मुंबई वगळता सर्व जिल्ह्यासाठी सक्षमपणे राबविण्याचे ठरले.या आदेशामुळे पिके उभी असताना मेंढपाळांना चराई ची होणारी अडचण दूर होईल व मेंढपाळांवरील हल्ले थांबतील.
वनविभागाने पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत कोल्हापूर विभागातील मेंढपाळांची थकीत असलेली नुकसान भरपाई करीता पावले उचलल्याचे समजले.
विनायक काळदाते