
बातमी
———-
‘धनगर समाजातील आर्थिक विवंचनेतील कुटुंबाना आदिवासींप्रमाणे खावटी अनुदान देण्यात यावे”
—————————————-
मागील सरकारने महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व योजना लागू केल्याची घोषणा केली होती व तसे आदेश सुद्धा काढले आहेत.
सध्या सुरू असलेल्या कोरोना रोगराई मुळे रोजगाराची मोठी अडचण निर्माण झाली असून अनेकांचा रोजगार सुद्धा गेला आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने आदिवासी समाजातील विवंचनेत जिवन जगणाऱ्या साडे अकरा लाख आदिवासी बांधवाना रु.चार हजार खावटी अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर निर्णय धनगर समाजातील दारिद्रय रेषेखालील नागरिक,भूमिहीन, विधवा परित्यक्ता यांना सुद्धा देण्यात दयावा असे निवेदन जेष्ठ धनगर समाज सेवक पुरुषोत्तमजी डाखोळे ,विनायक काळदाते यांनी मेल द्वारे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व मा.मंत्री.भटके विमुक्त, ओबीसी यांना पाठवले.
कोरोना व लाॅकडाउनमुळे धनगर समाजातील हा वंचित घटक रोजगार बुडाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून हाल अपेष्टा सहन करत आहे.
सरकारने आदिवासी समकक्ष म्हणून धनगर समाजातील पात्र व्यक्तींना सदर खावटी अनुदान योजना त्वरित लागू करावी अशी समाजाची मागणी आहे.