15ऑगस्ट -थोर धनगर सुपुत्र, आद्य क्रांतिकारक संगोली रायन्ना यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन-विनायक काळदाते.

🌹15 ऑगस्ट, धनगर समाजातील आद्य क्रांतिकारक संगोली रायन्ना यांची जयंती 🌹

“पुत्र व्हावा असा गुंडा ज्याच्या हाती क्रांतीचा झेंडा ” हे वचन ज्यांना तंतोतंत लागू पडते असे एकापेक्षा एक रत्न धनगर समाजात होउन गेली परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी त्यांच्यावर अन्यायच केला.धनगर समाज इतिहासाचे गाढे अभ्यासक,विश्लेषक संजय सोनवणी नेहमी म्हणत असतात तुझे आहे तुज पाशी परी जागा विसरलाशी.धनगर समाजातच आद्य क्रांतिकारक यशवंतराव होळकर झाले,पहिली महिला क्रांतिकारक भिमाबाई होळकर झाल्यात,इंग्रजाना नाकी नवू आणणारे आद्य क्रांतिकारक कर्णाटकचे संगोली रायन्ना झाले.
परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी दगा दिला, बेईमानी केली.आद्य क्रांतिकारक म्हणून महाराजा यशवंतराव होळकरांचे नाव लिहिण्याऐवजी वासुदेव बळवंत फडके यांचा उदोउदो झाला आणी यशवंतरावानतर वर्षे दोन वर्षे इंग्रजाना जेरीस आणणाऱ्या भिमाबाई ऐवजी झाशीची राणी लक्ष्मीबाईने ईतिहासात जागा बुक केली कारण इतिहास लिहीणारे बहुजन नव्हते व त्यांना धनगरांच्या या विरांना प्रसिद्ध होउ दयायचे नव्हते.

असेच ऐक विरपुरुष संगोली रायन्ना महाराष्ट्राला लागून कर्णाटकात होउन गेले.त्यांनी इंग्रजाना पाच सहा वर्षे सळोकीपळो करून ठेवले होते.संगोली रायन्ना हे कर्णाटक मधील कित्तूरची राणी चेन्नमा चे सेनापती होते.त्यांनी इंग्रजाना येथून हाकलन्यासाठी फार मोठी झुंज दिली.इंग्रजाना येथून हाकलन्यासाठी कोल्हापूर संस्थानची मदत सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केला.
संगोली रायन्ना भाग्यशाली देशभक्त होते त्यांची जयंती
15आगस्टला व पुण्यतिथी 26 जानेरीला असते.हा योग भारताच्या इतिहासात फक्त संगोली रायन्ना यांच्याच बाबतीत जुळून येतो.

आज 15ऑगस्ट रोजी त्यांची जयंती आहे.मातृभुमिच्या या थोर सुपुत्राची माहिती जाणून घेउ ,त्यांच्या चरीत्राचा कार्याचा प्रचार व प्रसार करु.

ब्रिटीश राजवटीविरुद्ध सलग – सतत 6 वर्षे लढून, ब्रिटीश राजवटीला ‘ सळो की पळो ‘ करून सोडणाऱ्या आणि वेळोवेळी संकटात आणणाऱ्या धनगर समाजातील या क्रांतीकाराकापै की एका अशा महान क्रांतिकारकाचे, आद्य स्वराज्यनायकाचे नाव ‘ रायान्ना ‘
रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध पुकारलेल्या असहकार आंदोलनास जनतेचा, अनेक गावाचा पाठींबा मिळाल्याने ब्रिटीशांची अक्षरश: झोप उडाली होती. रायान्नाने पोर्तुगीझाकडून ( गोआ ), कोल्हापूर संस्थानकडून ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढण्यासाठी पाठींबा मिळण्याचा प्रयत्न हि केला होता. रायान्ना नायकाला पकडण्यासाठी अनेक बक्षिसे, आमिषे ब्रिटीशांनी जाहीर केले होते. पण त्याचा काही एक उपयोग झाले नाही, कारण प्रजेची साथ रायान्नास होती. रायान्नाने ब्रिटीश सरकारचे खजिने लुटून जनतेस वाटले, ब्रिटीश सैनिक कॅम्पवर जोरदार हल्ले केले, पुणे – मुंबई पोस्टल सेवा बंद पाडल्यामुळे ब्रिटीश सरकारला रेवेन्यू गोळा करून मुंबईला पाठविणे फार कठीण झाले. रायान्नाने ब्रिटीश राजवटीविरुद्ध उभी केलीली हि स्वराज्य चळवळ हि आजच्या कर्नाटक, महाराष्ट्र , गोआ व आंध्र प्रदेशाच्या काही भागात जावून पोहोचली होती. ब्रिटिशांनी या भारताचे आद्य स्वराज्यनायकाची कार्याची नोंद आपल्या फाईल मध्येकरून ठेवली. नंदगड येथे रायान्ना नायकाची समाधी आहे. या समाधीस भेटदेण्यास, दर्शन घेण्यास फार दूरच्या खेडोपाड्यातील राष्ट्रीय समाजातील विविध जाती – जमातीचे लोक येतात. रायान्ना’सारखा शूरवीर पुत्र वाहवा आमच्या पोटी व्हावा, असा नवस नवविवाहित करून, प्रतिक म्हणून समाधी जवळ असलेल्या वडाच्या झाडावर लहान पाळणे येथे बांधतात.
भारत सरकारने बेंगलोर म्हणजे आताच्या बेंगलुरु स्टेशनचे नामकरण क्रांतिविर संगोली रायण्ण बेंगलुरु स्टेशन असे केले आहे.

धनगर समाजात असे थोर माणसं होउन गेल्याचा सार्थ अभिमान वाटतो सोबतच अशा थोर विभूतींची माहिती समाजापर्यंत पोहचत नाही याचा खेद वाटतो.
मातृभूमीच्या या थोर सुपुत्राला विनम्र अभिवादन🌹

संकलन-विनायक काळदाते.

जयंती., राष्ट्रीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *