कोरोना मध्ये सुरक्षित बालपण -श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ.

*श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा संचालित चाईल्डलाईन 1098 अमरावती द्वारे राबविण्यात येत आहे कोरोना मध्ये सुरक्षित बालपण*
*तालुका प्रतिनिधी:-* सविस्तर माहिती अशी की, मागील मार्च महिण्या पासून कोरोना या आजाराने संपूर्ण भारतामध्ये नये तर पूर्ण जगभरात थयमान घातले आहे. त्यामध्ये बालपण कसे सुरक्षित राहील याची दखल घेत महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत चालणाऱ्या चाईल्ड लाईन 1098 श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती द्वारा बालकांच्या मदती करीता मोलाचा वाटा घेतला त्यामध्ये काही बालकांचे पालक परराज्यात अडकले होते. तर काही बालकांना पालकच नव्हते तर काही बालक पालकांसह अमरावती येते अडकले होते. त्यामध्ये नागपूर मधून कामाकरीता आलेले कुटूंब आपल्या चार बालकांसह अंजनगावबारी या गावी लॉकडॉऊन मध्ये कोणताही सहारा नसताना अडकलं होते. अश्या विशेष गरजा असण्याऱ्या बालकांच्या मदतीकरिता चाईल्डलाईन अमरावती ने पुढाकार घेऊन एकूण 48 बालकांना जीवनावश्यक धान्य वाटप करून त्यांच्या देखभाल व पोषण्यासाठी विशेष मदत केली. त्यानंतर कोरोना प्रतिबंधक क्षेत्र चवरे नगर येथे सोशल डिस्टनसी पाळून एरियातील सर्व बालक व पालक यांना स्वछता, हात धुणे, कोरोना या संक्रमित आजारापासून बालपण कशे सुरक्षित राहील या विषयी मार्गदर्शन करून चाईल्डलाईन 1098 टोल फ्री क्रमांका विषयक सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.तसेच सर्व बालकांना मास्क , सॅनिटायझर, हँडवाश चे वाटप करण्यात आले. त्यानंतर चाईल्डलाईन मार्फत संपूर्ण एरियात सॅनिटायझर ची फवारणी केली. विशेष म्हणजे 21 जून योगा दिवसाचे अवचित्य साधून चाईल्ड लाईन अमरावती द्वारे या कोरोना संक्रमित आजारामध्ये योगा चे महत्व किती उपयुक्त आहे. त्या करिता चाईल्ड लाईन द्वारे केलेला बालगट, अंगणवाडी ग्रुप, शाळा ग्रुप, पोलीस ग्रुप, स्वयंसेवक गृप यांच्या माध्यमातून बालकांना योगा विषयक मार्गदर्शन चाईल्डलाईन संचालक प्रा. डॉ. सुर्यकांत पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने केले. तसेच या कोरोना मध्ये सुद्धा बालकांवर अत्याचार व शोषणा चे प्रकरणात वाढ झाल्याने ते थांबविण्यासाठी सुद्धा चाईल्डलाईन अमरावती द्वारा पाठपुरावा घेण्यात आला. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह अमरावती मध्ये थांबविण्यासाठी चाईल्ड लाईन अमरावती, बाल संरक्षण कक्ष व संबधित पोलिस स्टेशन अधिकारी यांनी पाठपुरावा घेतला व बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अन्वे बालविवाह थांबविन्यात आला आणि संबंधित अल्पवयीन बालकांच्या पालकांना व वरा कडील मंडळींना बालकल्याण समिती अमरावती यांच्या समक्ष उपस्थित करून बालिकेचा विवाह बालिका 18 वर्ष पूर्ण होई पर्यंत होणार नाही असे लिखित स्वरूपात लिहून घेतले व संबंधित पोलीस स्टेशन अंतर्गत सुध्दा नोटीस बजावण्यात आली. तसेच सध्यास्थित चाईल्डलाईन अमरावती द्वारा प्रकरणामध्ये सतत पाठपुरावा घेणे सुरू आहे. तसेच कोरोना मध्ये सुरक्षित व आनंदित बालपण कशे राहील या करिता *घरी राहा सुरक्षित राहा ही विशेष मोहीम ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे*. त्यामध्ये अमरावती जिल्हाच नव्हे तर इतर जिल्हा व राज्यातील बालकांचा चाईल्डलाईन 1098 अमरावती ग्रुप तयार करून त्यामध्ये बालकांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने *चित्रकला, रांगोळी, सामान्यज्ञान, चाईल्डलाईन 1098 सुरवातीचा इतिहास, प्रश्नमंजूषा, निबंध, कलाकृती टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे*, कोविड-19 च्या काळात बालकांकरिता अत्यावश्यक माहिती संसाधन इत्यादी उपक्रम राबविल्या आले. तसेच या उपक्रमा मध्ये सर्वच सहभागी बालकांना प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आलेत. त्याचप्रमाणे जर कोणत्याही बालकाला कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास, जसे हरवलेली कीवा सापडलेले बालके, अत्याचार ग्रस्त, शोषणाधिन, वैद्यकीय, बेवारस, भावनिक मदत व अश्या सर्वच बालकांना ज्यांना काळजी आणि संरक्षणाची नितांत गरज आहे. त्यांनी चाईल्डलाईन 1098 टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्याचे आव्हान चाईल्ड लाईन केंद्र समन्वयक यांनी केले. तसेच चाईल्डलाईन 1098 अमरावती या बालगट ग्रुपशी जुळण्यासाठी 07212567372 / 07212567688 संपर्क करावा.चाईल्डलाईन 1098 श्री. ह. व्या. प्र. मंडळ अमरावती द्वारा राबविण्यात येणाऱ्या कोरोना पासून सुरक्षित बालपण ही मोहिम राबविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पदमश्री श्री प्रभाकरराव वैध , सचिव प्रा. सौ. माधुरीताई चेंडके, चाईल्डलाईन चे संचालक डॉ. प्रा. सुर्यकांत पाटील, उपसंचालक प्रा. प्रशांत घुलाक्षे करत आहेत. तसेच कोरोना पासून बालपण सुरक्षित मोहीम राबविण्यासाठी मोलाचे कार्य चाईल्डलाईन केन्र्द समन्वयक अमित कपुर, समुपदेशक फाल्गुन पालकर, टिम मेंबर पंकज शिनगारे, शंकर वाघमारे, अजय देशमुख, सुरेन्द मेश्राम, मिरा राजगुरे, सरिता राऊत, चेतन वरठे, करीत आहेत.

मुर्तीजापूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *