
मुर्तिजापूर तालुक्यात कंझरा गावात पावसाचे थैमान
अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतीचा सर्वे करून सर्व शेतकर्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी.
मुर्तिजापूर प्रतिनिधी
मुर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाचा फटका दि .१७/८/२०२० रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतीचा सवै करून सर्व शेतकर्यांची नुकसानभरपाई देण्याची मागणी कंझरा गावातील लोकांनी प्रशासनाकडे केली आहे सोमवारी दुपारी बारा वाजता पासून पावसाला सुरुवात झाली पाऊस दुपारी चार वाजेपर्यंत सतत मुसळधार पाऊस एकसारखा पडत असल्याने नदी नाल्यांना अचानक पूर आला पाऊस। अतिवृष्टी ,जोरात सुरू होता त्यामुळे नाल्यांना पूर ओसडूंन वाहू लागल्याने कंझरा गावातील घरातही पावसाचे पाणी शिरले, गावाला पुराचा वेढा घातला गेला गावातील मंदिराला पावसाचा वेढा घातला होता सवै गावातील लोक भयभीत झाले होते, दैव बलवत्तर म्हणून अचानक चार वाजता नंतर पाऊस थांबला आणि गावातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला मात्र सोमवारच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले सोयाबीन, कपाशी हाता तोडांशी आलेला अनेकांचा घास पावसाच्या पाण्याने हिसकावून घेतला गावात बैल पोळ्या सारखा सण उत्सव साजरा करण्याची इच्छा नव्हती, प्रत्येक शेतकर्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले ही परिस्थिती पाहता पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले याची भरपाई म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर गावातील, शेतीचा, घरांचा सवै करुन शेतकर्यांना त्वरीत मदत करावी
सोमवारी आलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे, लवकरच शेतीचा, घराचा सवै करून त्वरीत मदत करावी
सरपंच कंझरा
जगदीशभाऊ मारोडकर