
🙏💐🌹बैल पोळा 🌹💐🙏खापरवाडा गावात आज कोरोना (कोवीड -19) ची खबरदारी म्हणून मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आज पर्यंतच्या गावाच्या ईतिहासात पहिल्यांदा बैलांचा पोळा भरवण्यात आला नाही. खापरवाडा ग्रामपंचायत ने दरवर्षी प्रमाणे प्रत्येक बैल जोडी चे पूजन करून त्या जोडी मालकाचा दुपट्टा देऊन सत्कार करण्याची परंपरा त्यांच्या घरी जाऊन पार पाडली.या वर्षी 65 बैल जोड्यांचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायतचा गावातील बैल जोडया वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यात अडचण येऊ नये हा त्यामागील उद्धेश आहे . या वर्षी 7 जोडया वाढल्याचे निदर्शनात आले. ही सर्व प्रक्रिया ग्रामपंचायत सर्व टीम योग्य नियोजन करून राबवत आहे. 🌹🌹🙏🙏(ग्रामपंचायत खापरवाडा )