सततचा पाउस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिक धोक्यात-प्रा.एल.डी.सरोदे

ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव.

मुर्तिजापूर प्रतिनिधी

मुर्तिजापूर तालुक्यात सततच्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे, पावसाळा सुरु झाला आणि पेरणी ची लगबग सुरु झाली साधारण जून च्या तिसऱ्या आठवड्यापासून पेरणीला सुरूवात झाली सुरूवातीला सोयाबीन बियाणे उगवण क्षमता नसल्याने सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली ह्या मानसिकतेतून शेतकरी बाहेर पडले तर शेतकऱ्यांना पिकांची वाढ जोमदार करण्यासाठी कोरपणी,निंदन फवारणी, मशागतीची कामे करावी लागली ह्या सर्व परिस्थितीतून शेतकरी बाहेर निघत नाही तर मुंगावर,उडीद पिकांवर अज्ञात रोगाचे आक्रमण झाले आणि शेतकरी चिंताग्रस्त झाला यावर्षी पावसाळा चांगला सुरू झाला होता आठवडाभर शेती मशागतीसाठी चांगला वेळ मिळत होता त्यामुळे जुलै महिन्यात पिकांची चांगली मशागत झाली पिकांची जोमदार वाढ झाली मात्र या आठवड्यापासून सततचा पाऊस व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सर्व पिकांवर अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे हातातोंडाशी आलेला घास मुंग पिकांवर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्यामुळे मुंगांचे,उडदाचे पिकं करपून गेले आहे मात्र कपाशीचे पीक व सोयाबीन पिकाचा चांगला भरोसा वाटत होता आठवडाभर पावसाने हजेरी लावल्याने व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांवर अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे या दोन-चार दिवसांत पाऊस बंद झाला आणि ढगाळ वातावरण निघून चांगले सुर्यप्रकाशीत रखरखीत उन्ह तापल्याशिवाय अळीचा प्रादुर्भाव कमी होणारं नाही असे क्रुषी तज्ज्ञांचे मत आहे किटकनाशके फवारणी करणे गरजेचे आहे मात्र सततच्या पावसामुळे फवारणी करणे शक्य नाही म्हणजेच शेतकरी आस्मानी संकटांनी घेरलेला आहे शेतीच्या मशागतीसाठी पैशाची उधळण केली होता जवळचा पैसा खर्च होऊन गेला आज पिकांची चांगली मशागत करून ही चांगले उत्पादन घरात येते की नाही याची खात्री नाही शेतीचा धंदा बिनभरोशाचा झाला आयुष्यात शेवटी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

प्रा.एल.डी.सरोदे,पत्रकार.

मुर्तीजापूर, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *