प्रगती शेतकरी मंडळ व जनमंच शेतकरी संघटनेच्या वतीने 1सप्टेंबरला उपोषणाचा इशारा.

प्रगती शेतकरी मंडळ व जनमंच शेतकरी संघटनेच्या वतीने 1 सप्टेंबर ला तहसिल कार्यालयावर लाषणिक उपोषणाचा इशारा
मुतिजापूर प्रतिनिधी
मतिजापूर तालुक्यातील शेतकरी प्रगती मंडळ व जनमंच शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या लाषणिक उपोषणाचा इशारा या.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मा.उपविभागिय अधिकारी महसूल मुतिजापूर यांच्या मार्फत शेतकरी समस्या व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे 2017 च्या बोंड अळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले , नुकसान भरपाईची रक्कम शासनाने अजून पयैंत दिली नाही तर यापैकी नुकसानभरपाई काही आर्थिकभार बियाणे कंपन्यांवर टाकण्यात आला होता.ती नुकसानभरपाई 3 वर्ष होऊनही कंपन्यांनी दिली नाही त्या करीता शासनाने विशेष प्रयत्न करून नुकसान भरपाई देण्यात यावी.किसान क्रेडिट कार्ड ऐवजी पिककजौला सी .सी . लिमिट मंजुरातीने बॅंकांनी कर्ज वाटप करावे दरवर्षी 31 मार्च रोजी पुर्ण कर्जोचा भरणा न घेता त्यावरील व्याज भरून घेऊन नुतनीकरण करून द्यावेत.त्यामुळे वारंवार कर्जमाफी किंवा कर्जाचे रूपांतर करण्याची गरज भासणार नाही कृषीमुल्य आयोगाने जाहीर केलेल्या हमी भावाने शेतमालाची बाहेरील बाजारात कोठेही खरेदी विक्री होत नाही.हमीभाव न मिळाल्यामुळे आधिच तोट्यात चालणारा शेती व्यवसाय आर्थिक ओझ्याखाली दबतो आहे.त्याला उभारणी देण्यासाठी.तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाला सरसकट ५०००रू एकरी आर्थिक मदत देते तीच योजना महाराष्ट्रातही लागू करण्यात यावा.दुधाला भाव नसल्यामुळे दुध उत्पादक आर्थिक विवंचनेत सापडले असून त्यांना योग्य भाव मिळण्याकरिता प्रयत्न करून दिलासा द्यावा.दोनलाखावरील कर्ज माफ केले परंतु काही पात्र कर्ज खात्याला अजुनही कर्जाची रक्कम जमा झाली नसल्यामुळे माफीतील शेतकरी थकबाकीदार दिसतो.अशा पात्र शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वाटप करण्यात यावे.वरील समस्येवर तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा वरील शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी १ सप्टेंबर मंगळवार रोजी तहसिल समोरील प्रांगणात लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे याची शासनाने दखल घेऊन समस्या त्वरीत निकाली काढण्यात याव्यात अशी मागणी प्रगती शेतकरी मंडळ व जनमंच शेतकरी संघटनेच्या वतीने राजु वानखडे,प्रा सुधाकर गौरखेडे, कैलास साबळे,संदीप मानकर,देविदासजी बांगड,सेवकरामजी लहाणे,प्राचार्य श्रावण रणबावळे यांनी लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे

मुर्तीजापूर, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *