कोरोनाला घाबरु नका काळजी घ्या-ग्रामपंचायत खापरवाडा

🙏🙏गावकरी बंधुनो कोरोना (कोवीड -19) ला घाबरून न जाता योग्य खबरदारी सह जागरूकता दाखवणे अति आवश्यक आहे. बाहेर गावावरून आलेल्या व्येक्तिनी आपली माहिती ग्रामपंचायतला देऊन आपली तपासणी न चुकता करून घ्यावी. पॉझिटिव्ह रुग्ण निघणे म्हणजे गुन्हा नाही फक्त तीन ते चार दिवसात तो रुग्ण निगिटीयू म्हणजे बरा होतो आपण पॉझिटिव्ह रुग्णा बद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नये ते आपल्या गावातील नागरिक आहेत त्याच्यावर व त्यांच्या कुटूंबावर हा आलेला कठीण प्रसंग आपल्या सर्वांच्या सहानुभूतीने लवकरच निवळणार आहे. काळजी करू नये सर्वांनी सोशल डिस्टन्स ठेऊन गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे गेल्यास मास्कचा वापर करावा. बाहेरून घरी आल्यास प्राधान्याने साबणाने हात स्वच्छ करून मास्क, रुमाल गरम पाण्यामध्ये डिटर्जन पावडर टाकून स्वच्छ करावा.निश्चित राहा आम्ही तुमच्या सोबत आहोत 🙏🙏(ग्रामपंचायत खापरवाडा )

मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *