भटके विमुक्त, ओबीसी, एससी/एसटी सर्वांनी एकत्र येण्याची गरज-प्रा.एल.डी.सरोदे/विनायक काळदाते.

🍁आरक्षण विरोधी वातावरणाचा धोका सर्वांनाच-भटके विमुक्त, ओबीसी व सर्वांनीच ऐकत्र वज्रमुठ बांधन्याची गरज. 🍁
लेखक प्रा.एल.डी.सरोदे/विनायक काळदाते.

देशात आरक्षण विरोधी सुप्त लाट तयार होत आहे असे वाटते.82 ते 85 टक्के लोकांना 50टक्के आरक्षणात खुश करण्याचा प्रयत्न झालेला आहे व उरलेली 15टक्के जनता 50टक्के आरक्षणाचे हक्कदार असतांना विनाकारण आरक्षणाच्या विरोधात खाजगीत गरळ ओकल्या जाते व नवीन पिढीचे आरक्षणाविरुद्ध मन कुलशित केल्या जाते हे सामाजिक एकोपा व प्रगतीला बाधक आहे.मागील पाच सहा वर्षात तर ही आरक्षण विरोधी विचारसरणी अधिकच फोफावत आहे असे दिसते.सरकार आणि यंत्रना सुद्धा याच्यात कधी मौन राखून, कधी उचापतखोर निर्णय देवून वातावरण अधिक गढूळ करत असते असे दिसते.ओबीसी शिष्यवृत्ती कपात,ओबीसी बजेटमध्ये कपात, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशात ओबीसींना 2 टक्केच आरक्षण देण्याचे धोरण, मडल आयोग पुर्णतः न स्विकारणे, रेणके आयोग गुंडाळने,जातीवार जनगणना न करणे,पदोन्नतीत आरक्षण न देणे, खाजगी संस्थामध्ये बिंदु नामावली न पाळणे व सरकारने त्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करणे,भटक्या विमुक्तांवर सतत हल्ले होत असताना व मागणी असताना अट्रासिटीचे संरक्षण न देणे व शेवटी सरकारच्याच या धोरणाची री ओढत न्यायालयाने आरक्षण हा मुलभूत अधिकार नाही असे म्हणने आणी आरक्षणाचे जातीनिहाय वाटप करण्यास प्रोत्साहन देणे हे प्रकार पाहले तर आरक्षणाला व या सर्व एस.सी./एस.टी./ओबीसी/व्हीजेएनटी ला सर्व बाजूंनी घेरून मारायचे असेच ठरवलेले दिसते.
परंतु आज एस.सी.कॅटेगरी ला अडचण आल्यास एस.टी.धावत नाही व एस.टी.ला अडचण आल्यास व्हीजेएनटी किंवा ओबीसी सोबत येत नाही आणी ओबीसीच्याअडचणीत ,मोर्चात वरील वर्ग मदत करत नाहीत. व्हीजेएनटी च्या अडचणीत अपवाद सोडला तर एस.सी./एस.टी./ओबीसी साथ देत नाहीत.

आज देशात आरक्षण व मागासवर्गीयांबद्दल द्वेष निर्माण करण्याचे काम एक छुपा एजडा राबविण्याप्रमाणे सुरू आहे हे कुणी नाकारु शकत नाही. हजारो वर्षे बरोबरीत न घेतलेल्या समुहाना फक्त सत्तर वर्षात थोडे झुकते माप मिळायला लागले तर देशात आकंडताडव सुरू झाला आहे आणी मागासवर्गीयांना सरकारचे जावई म्हणून संबोधल्या जाउ लागले आणि यासमुहाला हे फायदे कसे नाकारता येतील याबद्दल खल करण्यात येउ लागला.
आज देश खाजगीकरणाकडे वाटचाल करत आहे,रेल्वे, विज,शिक्षण, टेलिफोन, बॅका,पेट्रोल कंपन्या,जहाज बंदरे,रेल्वे स्टेशन विकल्या जात आहेत,इलेक्ट्रिक बोर्डाची कामे ठेकेदारांकडून करून घेण्यात येत आहेत,या सर्व विभागातील सरकारी नोकऱ्या संपुष्टात येत आहेत म्हणजेच ना रहेगा बास ना बजेगी बंसी … …..
सरकारी नोकऱ्या गेल्या म्हणजे आरक्षण गेले मग ते फक्त एस.सी/टी चेच नाही तर ओबीसी, व्हीजेएनटी सर्वच आले त्याच्यात.त्यामुळे येथून पुढील लढा हा सामुहिकपणे लढला तरच त्याचा प्रभाव दिसेल.एस.सी./एस.टी.ना थोडे सविधानाचे सरक्षण तरी आहे परंतु व्हीजेएनटीची परिस्थिती या खाजगीकरणात फार बिकट होणार आहे कारण राष्ट्रीय पातळीवर त्यांना कुठलेही आरक्षण नाही. तेव्हा भटक्या विमुक्ताची वज्रमुठ असणे क्रमप्राप्त झाले आहे,त्यांनी ओबीसीची ताकद व स्वताची ताकद एकत्र करून पुढील वाटचाल केली तरच सर्वाचा टिकाव लागणार आहे.एक एकटे लढतो म्हटले किंवा आज माझ्यावर कुठे हल्ला झाला अशी भुमिका ठेवली व तुम्ही दुसऱ्या ग्रुपच्या मदतीला गेला नाहीत तर उदया तुमच्या मदतीला कुणी येणार नाही.

हे सर्व पाहिल्यावर खाली सांगितलेली हिंदी कथा कशी बरोबर जुळते ते लक्षात येईल.
आज व्हीजेएनटी आपले अधिकार, आरक्षण मागतो आहे,त्याला सोबत दिल्यास तो सुद्धा आरक्षण बचाव मोहीमेत इतरांच्या खांद्याला खादा लावून सामिल होइल.
👇👇 कथा 👇👇

चूहा एक कसाई के घर में बिल बना कर रहता था।
एक दिन चूहे ने देखा कि उस कसाई और उसकी पत्नी एक थैले से कुछ निकाल रहे हैं। चूहे ने सोचा कि शायद कुछ खाने का सामान है।
उत्सुकतावश देखने पर उसने पाया कि वो एक चूहेदानी थी।
ख़तरा भाँपने पर उस ने पिछवाड़े में जा कर कबूतर को यह बात बताई कि घर में चूहेदानी आ गयी है।
कबूतर ने मज़ाक उड़ाते हुए कहा कि मुझे क्या? मुझे कौनसा उस में फँसना है?
निराश चूहा ये बात मुर्गे को बताने गया।
मुर्गे ने खिल्ली उड़ाते हुए कहा : जा भाई, ये मेरी समस्या नहीं है।
हताश चूहे ने बाड़े में जा कर बकरे को ये बात बताई… और बकरा हँसते हँसते लोटपोट होने लगा।
उसी रात चूहेदानी में खटाक की आवाज़ हुई, जिस में एक ज़हरीला साँप फँस गया था।
अँधेरे में उसकी पूँछ को चूहा समझ कर उस कसाई की पत्नी ने उसे निकाला और साँप ने उसे डस लिया।
तबीयत बिगड़ने पर उस व्यक्ति ने हकीम को बुलवाया। हकीम ने उसे कबूतर का सूप पिलाने की सलाह दी।
कबूतर अब पतीले में उबल रहा था।
खबर सुनकर उस कसाई के कई रिश्तेदार मिलने आ पहुँचे जिनके भोजन प्रबंध हेतु अगले दिन उसी मुर्गे को काटा गया।
कुछ दिनों बाद उस कसाई की पत्नी सही हो गयी, तो खुशी में उस व्यक्ति ने कुछ अपने शुभचिंतकों के लिए एक दावत रखी तो बकरे को काटा गया।
चूहा अब दूर जा चुका था, बहुत दूर!
अगली बार कोई आपको अपनी समस्या बतायेे और आप को लगे कि ये मेरी समस्या नहीं है, तो रुकिए और दुबारा सोचिये।
समाज का एक अंग, एक तबका, एक नागरिक खतरे में है तो पूरा समाज व पूरा देश खतरे में है।
अपने-अपने दायरे से बाहर निकलिये। स्वयं तक सीमित मत रहिये। सामाजिक बनिये !!

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकलन-प्रा.एल.डी.सरोदे
विनायक काळदाते.

Breaking News, अकोला, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *