
✍️चार महिन्यात रस्ता उखडला🛣️
अंबाजोगाई- अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा-सोनहिवरा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जनतेच्या अनेक दिवसांच्या मागणी नुसार व पाठपुराव्यानंतर हाती घेण्यात आले होते व ग्रामस्थांच्या सोयीसाठी चार महिन्यापूर्वीच पूर्ण केले होते.परंतु चारच महिन्यात हे डाबरीकरण उखडून गेले असून ग्रामस्थांनी सदर कामाच्या दर्जा बद्दल शंका व्यक्त करीत हे काम लवकरात लवकर पुन्हा व्हावे याकरिता मा.उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.