
अकोल्यात राष्ट्रवादी प्रवेशाची लाट निर्माण झाली.
मा.आ.हरिदासजी भदे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतल्यानंतर अकोला जिल्ह्यातील राजकारणात आमुलाग्र बदल घडत असून पक्षप्रवेशाचे सोहळ्यावर सोहळे होत आहेत.कोरोना, सोशलडिस्टन्सिगचे नियम पाळत दररोज पक्ष प्रवेश होत आहेत. दिनांक 31ऑगस्ट रोजी कमीत कमी 500 कार्यकर्त्यांनी व इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला.जनतेच्या नजरेत आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उज्वल भविष्य असलेला पक्ष झाला आहे.