अकोल्यात राष्ट्रवादी प्रवेशाची लाट.

अकोल्यात राष्ट्रवादी मध्ये प्रवेशाची लाट.

मा.आ.हरिदासजी भदे यांनी वचित मधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची लाट निर्माण झाली आहे.

अकोला- अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जंगी प्रवेश सोहळा सोमवारी पार पडला. या प्रवेश सोहळ्यामध्ये भारिप-बमसं व वंचितच्या 200 पेक्षा अधिक ज्येष्ठ व माजी पदाधिकाऱ्यांसह महिला व युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन राष्ट्रवादीला जिल्ह्यात नंबर वन बनविण्याचा संकल्प घेतला. राष्ट्रवादीच्या या जंगी प्रवेश सोहळ्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, माजी आमदार हरिदासजी भदे, माजी आमदार बळीरामजी सिरस्कार , राहुलभाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश घेणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा वाढता ओढा लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला जिल्ह्यात आता मोठ्या भक्कम स्थिती मध्ये पोहोचला आहे. सोमवारी आणखी एक भव्यदिव्य जंगी प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेश सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सह इतर संस्थांमध्ये तसेच भारिप-बमसं व वंचित मध्ये महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह महिला व युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैया गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रवेश सोहळ्याला आ. अमोल मिटकरी, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, माजी आमदार हरिदासजी भदे, माजी आमदार बळीरामजी सिरस्कार, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा पिसे पाटील, ज्येष्ठ नेत्या डॉ. आशाताई मिरगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, राहुल डोंगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई राऊत, महासचिव डॉ. विजय वाघ, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव म्हैसणे, परीमल लहाने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना सांगितले की आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंतचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते असल्याने आता आपले नेटवर्क चांगले वाढले आहे. त्यामुळे सर्वांनी सर्व स्तरावर पक्ष वाढविण्यासाठी जोमाने कामाला लागा. कुणालाही कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास माझ्यासह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकारी तुमच्या एका हाकेवर हजर होतील. तेव्हा कशाचीही चिंता न करता बिनधास्तपणे जोमाने कामाला लागा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार मा. हरिदासजी भदे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विश्वजीत शिरसाट यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा महासचिव डॉ. विजय वाघ यांनी केले.

– यांनी घेतला प्रवेश

या प्रवेश सोहळ्यामध्ये भारिप-बमसंचे अकोला जिल्हा माजी महासचिव अश्वजीत शिरसाट यांचेसह सागर कढोणे, विलास गवई, विनोद नागे, अर्चनाताई थोरात, विद्याताई अंभोरे, विजय घावट, दिनकरराव नागे, विजय चव्हाण, केशव बिलबिले, निलेश माऊलीकर, दिनकर पाटील, मनोज करणकर, कैलास इंगळे, प्रमोद वानखडे, शशिकलाबाई धाडसे, संतोष गवई, राजू ताजणे, प्रदीप सुखदाने, अक्षय सुखाडे, प्रवीण खंडारे, नितीन आठवले, आनंदा जुमळे, अमरदीप दाभाडे, भूषण दामोदर, आकाश वानखडे, ज्योतीताई गवई, मालती सरदार, दीपक सोळंके, शुभम सावळे, कुमार सावळे, मुरलीधर होनाळे पाटिल, सदानंद ढोरे, विजय अतरकर, प्रमोद काढोकार, बाबाराव वानखडे, मुस्तजिन खान, लक्ष्मण खंडारे, विजय बोचरे, तानाजी सागोकार, सुनील सिरस्कार, सचिन बोचरे, दिलीप कुरई, विजय चव्हाण, जगदीश देवकते, संतोष वडतकार, विनोद खेडकर, दीपक वडतकार, प्रशांत भरणे, आशिष कोल्हे, अभी नवलकार, सागर कोगदे, रवी बोंगे, अमोल घोंगे, सचिन बचे, वासुदेव बोरसे, राजेंद्र घोंगे, अब्दुल फारूक हमीद, डॉ. आशिष आले, शंकर मरसुखले, विष्णू राठोड, केशव चव्हाण, कासनदास जाधव, जानराव लोणाग्रे, प्रमोद प्रधान, भिक्षुक गवई, गोपाल चव्हाण, वर्षाताई शिरसाट, स्नेहल खंडारे, सृष्टी शिरसाट, संजय किर्तक, राजेंद्र गेंदे, संजय खंडारे, गोपाल ओळंबे, विशाल सातव, विष्णूभाऊ शेगोकार, तुषार शिरसाट, महेंद्र अंदुरकर, संजय मोहिते, वासुदेव वानखडे यांच्यासह दोनशेच्यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

अकोला, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *