मुर्तिजापूरातील जनता कर्फ्युने कोरोना नाही तर लहान व्यावसायिकांचा रोजगार जाईल..

मुतिजापूरात कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी व्यापारी बंद चा एल्गार पुकारला
लघू व्यावसायिकांची नाराजी मुतिजापूर तालुका प्रतिनिधी
मुतिजापूर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे शहरात कोरोना बाधीतांची संख्या तीनशेच्या वर पोहचली आहे दररोज दहा ते पंधरा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे अंदाजे वीस लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण कोरोना बाधीत होत आहे या परिस्थितीत शहरातील व्यापारी व नगरपरिषद च्या लोकप्रतिनिधीनी दि. ५/९/२०२० पासून दा. ७/९/२०२० पयैंत मुतिजापूर बंद चे आवाहन केले आहे बुधवारी संध्याकाळी व्यापारी व काही नगरसेवकांनी बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला गुरूवारी शहरातील सर्व सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आली असता काही नागरिकांनी व सर्व लघू व्यावसायिकांनी नाराजीचा सूर काढत, मुतिजापूर शहर बंद करून कोरोना मुक्त होणार नाही तर शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे तसेच शहरात खरेदी करीता आलेल्या बहुतेक लोकांना तोंडाला मास्क बांधत नाहीत आणि शासनाच्या नियमांचे पालन करत नाहीत यासाठी शहरातील नगरपालिकेच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, तसेच पोलिस प्रशासनाने चौका चौकात पोलिसांनी गदीँ च्या ठिकाणी लक्ष देऊन नियमांचे पालन करण्यासाठी शहरात जरब निर्माण करावा लागेल त्यानंतर नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रशासनाने संपूर्ण शहरात सँनिटायझर करून घेण्यात यावे नगरपरिषद च्या पदाधिकारी यांनी लोकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, शहरातील साफसफाई, उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना दंड करण्यात यावा तेव्हाच मुतिजापूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी करता येणार अन्यथा कितीही दिवस शहर बंद ठेवून काही फायदा होणार नाही असे मुतिजापूर शहरातील लघू व्यावसायिकांचे व जनतेची म्हणने आहे

उद्योग व्यवसाय., मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *