
धनगर समाजाने एकत्रितपणे आंदोलन करावे-मा.आ.हरिदास भदे.
धनगर समाजातील वेगवेगळे नेते व संघटना आप आपल्या पद्धतीने आरक्षण व इतर मुद्यावर आपल्या मनाला वाटेल तसे आंदोलने करत आहेत त्यामुळे समाजाची ताकद विखुरल्या जात आहे , समाज वेगवेगळ्या गटा तटात विभागल्या जातो व शेवटी हातात काहीच लागत नाही त्यामुळे समाजातील सर्व नेत्यांनी, संघटनानी एकत्र येउन सकल धनगर समाजाच्या बॅनर खाली लढा उभारावा असे मत धनगर समाजाचे नेते व मा.आ.हरिदासजी भदे यांनी व्यक्त केले आहे.
समाजसेवक श्री.नवनाथ पडळकर यांनी ठेवलेल्या ऑनलाईन मिटींग मध्ये मा आ.हरिदासजी भदे बोलत होते.
सध्या सुरू असलेली वैयक्तिक आंदोलने हे नेतृत्व विकासासाठी च उपयोगाची असून त्याचा समाजाला कुठलाही फायदा होणार नाही असे ते बोलले.
सध्या सुरू असलेली आदोलने समाजाची आहेत की विरोधीपक्षाची आहेत असा संभ्रम समाजात पसरला आहे.
बरोबर सर