
सामुहिक नेतृत्वात धनगर समाजाचा लढा उभा राहावा.मा.आ.हरिदास भदे
गेल्या काही दिवसांपासून झूम मिटिंग व व्हिडीओ काॅन्फरन्सिग च्या माध्यमातून बऱ्याचवेळा चर्चा झाल्यात त्यामधून महाराष्ट्रातील सर्व पक्ष, संघटना व मंडळे एका झेंड्याखाली आणून सामुहिक नेतृत्वात धनगर समाज आरक्षणाचा लढा उभा करण्याचे बाबतीत बहुतांश मान्यवरांचे एकमत होउ घातलेले आहे.
या सर्व मान्यवरांचे मनापासून आभार.त्याच बरोबर सर्वच समाजबांधवांनी सामुहिक लढ्यात सामिल व्हावे ही विनंती कारण आपण समाजासाठी लढतो आहोत ही आपली भुमिका समाजासमोर येउद्या.
सर्वांनी एकत्र यावे ही समाजातील युवकांसह सर्वांचीच इच्छा आहे व कुणीही वेगळी चूल मांडू नये ही सुद्धा भावना आहे.
सर्वांनीच या सामुहिक आंदोलनात सहभागी व्हावे व स्वता प्रयत्न करुन समाजाला सामिल होण्याचे आव्हान करावे असे मला वाटते.
या आंदोलनाच्या धोरण व नियोजन समितीमध्ये ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांच्यासाठी समितीचे दरवाजे उघडे ठेवावी.
आपला विश्वासू
हरिदास भदे
मा.आ.अकोला.