मुर्तिजापूर येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन-प्रा.एल.डी.सरोदे.

धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी-
उपविभागीय अधिकारी महसूल यांना सकल धनगर समाजातर्फे निवेदन.

मुर्तिजापूर प्रतिनिधी
मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी महसूल मुर्तिजापूर यांना देण्यात आले आहे, गेल्या सत्तर वर्षांपासून महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून आंदोलन करीत आहे, प्रत्येक पक्षांच्या सरकारने अनेक वेळा आश्वासन दिले आहे मात्र राजकारण पुर्ण झाले म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाली की लगेच धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात विसर पडतो पुन्हा नव्याने निवडणूका जवळ आल्या की लगेच धनगर समाजाच्या आरक्षणावरून रणकंदन सुरू होते पण धनगर समाजाच्या पदरात मात्र काहीच पडत नाही,घटनेच्या ३४२ व्या कलमानुसार अनुसूचित जमाती आरक्षण सुची क्रं ३६ मध्ये ओराव धनगड म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे ,पुर्वी विदर्भ हा महाराष्ट्रात सामिल होण्याआधी विदर्भातील धनगर समाज अनुसूचित जमातीत होता नंतर कारण काय तर धनगड ला आरक्षण आहे,धनगरांना आरक्षण नाही मात्र प्रशासकीय ती चूक झाली आहे “र” चा “ड” झाला आणि धनगर समाजाला कायमचे आरक्षणापासून वंचित केले आहे.मात्र संपूर्ण महाराष्ट्रात धनगड म्हणून जातीचा सर्वेक्षण करण्यात आले असता धनगड नावाची जमातच अस्तित्वात नाही म्हणजेच धनगड हेच धनगर आहेत असे अपेक्षित असतांना मात्र धनगर समाजाला सत्तर वर्षांपासून न्याय मिळाला नाही म्हणून त्या समाजाला रस्त्यावर ची लढाई लढावी लागत आहे, मागच्या सरकारने मा.देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही म्हणजेच भाजपाचे सरकार केंद्रात ही होते व महाराष्ट्रातही पण त्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही,शेवटी धनगर समाजाला २२ योजना व १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली पण अंमलबजावणी केली नाही म्हणून विद्यमान सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व २२ योजना च्या संदर्भातील १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी महसूल मुर्तिजापूर यांच्या मार्फत निवेदन सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी प्रा एल डी सरोदे ,बाळाभाऊ शितोळे ,रविभाऊ मार्कड,आशीष कोल्हे, सचिन दिवनाले, रविंद्र घुरडे प.स.सदस्य , निखिल गाढवे, सुशील सातिंगे, श्रीकृष्ण गाढवे,चेतन काळे,वैभव काळे,प्रमोद ढेंगे, भानुदास देवकते, केशवराव महारनर,अक्षय भागवत,संजय उघडे,अनुप डंवगे रमेशभाऊ हेंगड,सतिश पंडित,विकास चारथळ, इत्यादी समाजबांधव उपस्थित होते

निवेदन, मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *