नाशिक येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन.

नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

दि.28 सप्टेंबर2020 रोजी नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी, धनगरांच्या योजनेसाठी रु.1000 कोटीची तरतूद व इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.कलेक्टर कार्यालयासमोर धनगर समाजाने जागरण गोंधळ घालून सरकारचे लक्ष्य वेधन्याचा प्रयत्न केला.ना नेता,ना पक्ष व ना संघटना अशा पार्श्वभूमीवर सकल धनगर समाजाचे हे आंदोलन युवा समाजनेते भाउलालजी तांबडे व खंडेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
सदर आंदोलनात जेष्ठ समाजसेवक भाउलालजी तांबडे,खंडेराव पाटील, विनायक काळदाते,रतन हिरे सौ.संगिताताई पाटील, सौ.शोभा आगोने,कैलास हळनोर,नवनाथ पारखे,भागवत मुरडणर,धनंजय बुचुडे,देविदास भडांगे, हेमंत शिंदे,सदाशिव वाघ,ज्ञानेश्वर ढेपले,अण्णा सापनर,किरण थोरात, श्री.चितळकर,गनेश पदमर,अतुल हाके,छगनराव ढोणे,प्रशांत खताळ,श्री.बारगळ व अनेक समाजबांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. जागरण गोंधळाचा कार्यक्रम व भंडाऱ्याची उधळन यामुळे आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.धनगर समाजाच्या अराजकीय आंदोलनाचा नवीन पायंडा जिल्ह्यात यानिमित्ताने पडला.

नाशिक, निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *