सकल धनगर समाजातर्फे येवल्यात निवेदन-दत्तात्रय वैद्य.

येवला _ धनगर आरक्षण साठी येवल्यात आंदोलन_
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी सरकार ने लक्ष घालून समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी येवल्यात
आंदोलन करून तहसीलदार श्री. रोहिदास वारुळे यांना समाजातील कार्यकर्त्या कडून निवेदन देण्यात आले. धनगर समाज हा मुळात घटनेनुसार आदिवासी म्हणून गणला गेलेला आहे,त्याबाबत घटनेत स्पष्ट तरतूद केलेली असताना ही सरकारणे राजकीय द्वेशापोटी जाणून बुजून टाळाटाळ केली असून त्याचा विपरीत परिणाम समाजाला भोगावा लागत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर सामाजाच्या मागण्या मान्य कराव्या व धनगरांनाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या करीता सामाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन निवेदन देण्यात आले, त्यावेळी समाजातर्फे येवला तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक दत्तात्रय वैद्य, एडव्होकेट शंतनु कांदळकर येवला मार्केट कमेटीचे संचालक कांतीलाल साळवे, खरेदी विक्री संघाचे मा. चेअरमन बबन साळवे, जायदारे चे मा. सरपंच दत्तू देवरे , उत्तम खांडेकर, दत्तात्रय खांडेकर, श्रावण साळवे, गणपत काळे, रमेश रोकडे, रमेश साळवे , नितीन काळे , चंद्रभान व्यापारे,कारभारी आगवन,, भिमराव खांडेकर,प्रवीण जानराव, संजय व्होंडे रमेश जानराव, संतोष काळे,कैलास खांडेकर,योगेश व्होंडे,देवराम वंसे बबन साळे, ईश्वर व्होंडे, मधुकर जानराव,व इतर समाज बांधव सामाजिक अंतर ठेवून मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदन, येवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *