
🏇चांदवड येथे सकल धनगर समाजाची सभा संपन्न.
दिनांक 10ऑक्टोंबर रोजी चांदवड मार्केट कमिटी हाॅल मध्ये सकल धनगर समाजाची मिटींग संपन्न झाली.
सदर मिटींगला जेष्ठ समाजनेते भाउलालजी तांबडे,खंडेराव पाटील, शिवाजीदादा ढेपले,विनायक काळदाते यांनी समाजाच्या चळवळी विषयी उद्बोधन केले.मिटिंगचे नियोजन मार्केट कमिटीचे माजी अध्यक्ष विक्रमबाबा मार्कंड यांनी केले तर बापू बिडगर,बाळू सोनवने,समाधान बागल,अण्णा सापनर यांनी तालुक्याची भुमिका मांडली. समाज आंदोलनासाठी,चळवळीसाठी जिल्ह्याचे स्वताचे नेतृत्व तयार व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली तसेच या आरक्षण चळवळीचे नेतृत्व जेष्ठ समाजसेवक भाउलालजी तांबडे यांनी करावे असे मत बहुतांशी वक्त्यांनी केले. पक्ष,संघटना गट,तट विरहित समाज संघटन या निमित्ताने जिल्ह्यात उभे राहत असल्याचे ऐकून चित्र या प्रसंगी दिसून आले.
सभेला साहेबराव बागल,बि.के.धायगुडे, देवचंद बिडगर,रामदास शिंदे,ज्ञानेश्वर ठोंबरे,विजय चितळकर, तात्याभाऊ वाघमोडे, बंडुकाका दुकळे,बाजीराव राजनोर,पिंटूभाउ गाढे व परीसरातील समाजबांधव उपस्थित होते.