
*कोविड-१९ पासुन बालकांची सुरक्षा व संरक्षण – चाईल्डलाईन 1098 श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती द्वारा जनजागृती कार्यक्रम* सविस्तर माहिती अशी की, कोरोना संक्रमित आजारामध्ये सर्वच मुले आपल्या परिवारा मध्ये घरी असून सुद्धा असुरक्षित आसल्याची धक्कादायक बाब पुढ्ये येत आहे. यामधून बालक सुरक्षित राहावे त्याकरिता महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत 24 तास दिवस- रात्र बालकांच्या मदती करिता चालणाऱ्या चाईल्डलाईन 1098 श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती च्या वतीने बालकांचा मदतीचा टोल फ्री क्रमांक 1098 ची जनजागृती करणे सुरू आहे. त्या करिता शहरातील खरकाडीपुरा अमरावती येथे सोशल डीस्टेन्सिंग चे भान ठेवून चाईल्ड लाईन १०९८ चा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्याच प्रमाणे 2 ऑक्टोबर पासून स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ मन, स्वच्छ विचार, स्वच्छ व्यवहार मोहीम सुद्धा राबविण्यात आली. त्यामध्ये सर्वप्रथम म्हाडा कॉलोनी येथे घरोघरी जाऊन सध्यास्थीत कोरोना संक्रमित आजारापासून बालकांचे संरक्षण कसे होईल व त्याविषयीची बालकांची काळजी व देखभाल कशी करावी या विषयीची जनजागृती करण्यात आली. त्यानंतर निंभोरा येथे पूर्ण गावात स्वच्छता अभियान करून वृक्षारोपण लावण्यात आले. तसेच बालकांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी स्वच्छ भारत सुंदर भारत – स्वच्छ मन, स्वच्छ विचार, स्वच्छ व्यवहार या विषयावार घरीच सुरक्षित राहून ऑनलाईन पद्धतीने निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे मध्ये 200 मुलांनी आॅनलाईन पद्धतीने सहभाग घेतला व सर्वच सहभागी बालकांना प्रशस्ती प्रमाणपत्र देण्यात आले. कोरोना ह्या आजारा पासुन बालकांचे संरक्षण होण्यासाठी बालकांना मोफत मास्क, हॅन्डवॉश वाटप सुद्धा करण्यात येत आहे व हात धुणे, मास्क लावणे, सोशल डिस्टेन्सिंग कशी ठेवावी, सुरक्षेतेसाठी कोण-कोणात्या उपाययोजना केल्या पाहिजेत ह्या बाबतीत सुद्धा मार्गदर्शन करण्यात येत असून प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविण्यात येत आहे. कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पदमश्री श्री प्रभाकरराव वैध , सचिव प्रा. सौ. माधुरीताई चेंडके, चाईल्डलाईन चे संचालक प्रा.डॉ. सुर्यकांत पाटील, उपसंचालक प्रा. प्रशांत घुलाक्षे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित अंगणवाडी सुपरवायझर प्रेमीला भरणे, सेविका छाया किटूकले, हेमा अनासाने, विजया चव्हाण , शेलके महले, स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या महिला वर्ग, किशोरवयीन बालिका व बालके यांची उपस्थित होती. तसेच बालकांच्या मदती साठी दिवस-रात्र मोलाचं कार्य करणाऱ्या चाईल्डलाईन १०९८ चे केन्द्र समन्वयक फाल्गुन पालकर, समुपदेशक अमित कपूर, टिम मेंबर पंकज शिनगारे, शंकर वाघमारे, अजय देशमुख, सुरेन्द मेश्राम, मिरा राजगुरे, सरिता राऊत, चेतन वरठे करीत आहे.