बानाई माता मंदिरासाठी यशवंत सेना उतरली मैदानात.

🕉️बानाई मंदिरासाठी यशवंत सेनेच्या नेतृत्वात धनगर समाजाने कसली कंबर.🕉️

मल्हारी मार्तंडाने बानूच्या नादी लागून धनगराच्या रुपात जेथे बानूची मेंढर चारली त्या नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक चंदनपूरी गावात बानाई मंदिरासमोर ग्रामपंचायत अतिक्रमण करून अनावश्यक बांधकाम करत आहे.मागील आठवड्यात यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष श्री.अरुणदादा शिरोळे व निंबादादा जाधव यांच्याकडे ग्रामस्थांनी ही तक्रार मांडली होती.
येथून हा विषय महाराष्ट्राभर पोहचला व चांदा टू बांदा धनगर समाज खडबडून जागा झाला.

समाजाचे निवृत्त तहसीलदार आर.पि.कुवर साहेब यांनी पन्नास वर्षाचे सदर जमिनीचे कागदपत्रे काढली. दोनच दिवसापूर्वी समाजाने मा.ग्रामविकासमंत्री, मा.पालकमंत्री व चंदनपूरी परिसराचे लोकप्रतिनिधी,मा.कृषीमंत्री ना.दादासाहेब भुसे यांना तसेच मालेगांव गट विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना निवेदन देवून ग्रामपंचायत करीत असलेले बांधकाम थांबविन्यासाठी मेल द्वारे,पत्राद्वारे निवेदन दिले.

आज दिनाक 2 नोव्हेंबर रोजी समाजनेते व यशवंत सेना प्रदेश सचिव मा.खंडेराव पाटील यांच्या नेतृत्वात मा.जिल्हाधिकारी नाशिक व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून सदर बांधकाम थांबवने कामी निवेदन दिले.
यावेळी श्री.खंडेराव पाटील,आर.पि.कुवर साहेब,अँड.अनिल शिदे, विनायक काळदाते, सौ.संगिताताई पाटील, अरुणदादा शिरोळे,निंबादादा जाधव,बापू मोरे,अभिजित चिंचोले ,शिवाजी चिंचोले,गोकुळ चिंचोले,सागर चिंचोले,गणू बोराडे,प्रकाश मोरे
व समाजबांधव उपस्थित होते.

शासनाने समाजाच्या अस्मितेचा विषय समजून सदर बांधकाम त्वरित थांबवावे नाहीतर समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन, उपोषण करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला.

धार्मिक, नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *