धनगर धर्मपीठाच्या नागपूर जिल्हाध्यक्ष पदी मा.पुरुषोत्तमजी डाखोळे.

जेष्ठ समाजसेवक पुरुषोत्तमजी डाखोळे यांनी धनगर धर्मपीठाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष पद स्विकारल्या बद्दल धन्यवाद🌹

समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक व नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच माजी समाज कल्याण सभापती मा.पुरुषोत्तमजी डाखोळे यांनी धर्मपीठाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष पद स्विकारले.श्री.डाखोळे साहेब हे प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून, चौकशी करून स्विकारणारे व्यक्तीमत्व आहे.अनेक वर्षे समाजाचे पूर्व विदर्भात प्रबोधन करुन त्यांनी समाजाला दखलपात्र केले आहे.
आज ते समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक म्हणून नवीन पिढीच्या पाठीशी उभे असतात.
समाजाच्या न्यायालयीन केसचे ते पिटीशनर आहेत.त्यांच्या सहभागामुळे समाजाची न्यायालयीन केस डिसमिस होण्यापासून राहली कारण ज्याला एस.टी.चे प्रमाणपत्र नाकारल्या गेले आहे तोच उच्च न्यायालयात न्याय मागू शकतो व त्यापैकी एक म्हणजे श्री.डाखोळे साहेब.

प्रचंड जनसंपर्क परंतु प्रसिद्धीपासुन चारहात लांब राहणारे व्यक्तीमत्व म्हणजे डाखोळे साहेब.
समाजातील जेष्ठ नागरिक, अराजकीय मंडळी,सेवानिवृत्त कर्मचारी,गृहिणी,पापभिरू समाजबांधवांना धर्मपीठाच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण व्हावे,समाज संघटीत व्हावा,सुशिक्षित, निर्व्यसनी व्हावा,प्रगतीशील व्हावा व सर्वांचे आयुष्य सुखी व्हावे,आनंदी व्हावे अशा उदात्त हेतूने स्थापन झालेल्या धर्मपीठाला जेष्ठ समाजबांधवांचे मार्गदर्शन आवश्यकच आहे.
श्री.डाखोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धर्मपीठाचे समाज शिक्षण व प्रबोधनाचे काम नक्कीच भरारी घेईल.
✍️विनायक काळदाते.
प्रभाकर दिवनाले.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *