श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने यांची धनगर धर्मपीठाचे अमरावती जिल्हाध्यक्ष म्हणून निवड.

श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने-धनगर धर्मपीठ जिल्हा अध्यक्ष अमरावती यांना शुभेच्छा🌹
आपली नोकरी सांभाळून समाजकार्यात मोलाचे योगदान देणारे श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने यांना समाजकार्याची आपल्या काँलेज जिवनापासूनच आवड आहे.अमरावती जिल्ह्यात आणी विदर्भ प्रदेशात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून उभ्या महाराष्ट्रात ते परिचित आहेत.
दरवर्षी अमरावती येथे धनगर समाज वधूवर मेळाव्याचे आयोजन त्यांच्या पुढाकाराने होत असते.विदर्भात अकोट व अमरावती येथील वधूवर मेळाव्याना समाजाचा खूप मोठा प्रतिसाद असतो.
मा.ढोमने साहेब व त्यांच्या सौभाग्यवती सौ.शारदा ढोमने या दांम्पत्याने समाजकार्यात वाहून घेतले आहे व सध्या समाज जोडो या आँनलाईन काँन्फरन्सच्या आयोजनात हे दांम्पत्य सक्रीय आहे.
अमरावती शहरात धनगर सारस्वतांचा मोठा समुह एकत्र करण्यात सुद्धा त्यांना यश आले असून भविष्यात समाजाच्या साहित्य संमेलनाची सुद्धा नियोजन आहे.
श्री.ज्ञानेश्वर ढोमने यांनी देवा (धनगर समाज ऐम्प्लाईज असोसिएशन)मार्फत समाजातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला वाचा सुद्धा फोडली आहे.
अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या खांदयावर धनगर धर्म पीठाची धुरा सोपवल्यामुळे अमरावती जिल्ह्यात व ऐकून विदर्भात समाज प्रबोधन व शिक्षणाचे काम जोमाने वाढणार आहे व भविष्यात धर्मपीठ त्यांच्या अर्धांगिनी सौ.शारदाताई ढोमने यांना सुद्धा धनगर धर्मपीठाच्या कामात सहभागी होण्यासाठी विनंती करणार आहे.
श्री.ढोमने साहेबांना त्यांच्या ह्या सामाजिक व धार्मिक जबाबदारीत भरघोस यश मिळो या शुभेच्छा.🌹

श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने, 9423434223

✍️विनायक काळदाते.
प्रभाकररावजी दिवनाले

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *