धर्मपीठ महिला राज्यधक्ष पदी सौ.शारदा ढोमने यांची नियुक्ती.

🕉️ सौ.शारदाताई ढोमने यांची धनगरधर्म पीठाच्या महिला राज्यधक्ष पदी निवड🌹

धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांपेक्षा अधिक असून संस्कृती संगोपन व संस्कारक्षम पिढी निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल महिला करत आहेत. त्यामुळे धनगर धर्मपीठाची महिला कार्य कारिणी असणे गरजेचे आहे,आवश्यक आहे.
सौ.शारदा ज्ञानेश्वर ढोमने -अमरावती ह्या धार्मिक क्षेत्राबरोबर महिला शिक्षण, संघटन,आरोग्य वगैरे विषयात काम करत असून महाराष्ट्रभर महिलाच्या प्रबोधनात काम करत आहेत.त्यांचे संघटन कौशल्य व समाजकार्य उत्कृष्ट आहे.समाजजोडो अभियानात सुद्धा त्या सक्रिय असून नुकतीच उज्जैन येथे शिबिराला उपस्थित राहून आलेल्या आहेत.
सौ.शारदा ढोमने यांना धनगर धर्म पीठाच्या महिला विंगची जबाबदारी दिल्यामुळे त्या महाराष्ट्रभर समाजातील धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचे संघटन करतील असा विश्वास आहे.
सौ.शारदा ढोमने यांची धनगर धर्मपीठाच्या महिला शाखेच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी नियुक्ती करण्याची शिफारस धनगर धर्म पीठाचे विदर्भ अध्यक्ष विनायक काळदाते व विदर्भ धर्म गुरू प्रभाकररावजी दिवनाले यांनी केली व धर्म पीठाच्या राज्य शाखेने त्याला मान्यता दिली.
सौ.शारदाताई ढोमने यांची धनगर धर्म पीठाच्या महिला अध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे सर्व समाजबांधवांना आनंद झाला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

अभिनंदन!🌹अभिनंदन!🌹

🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *