
🕉️धनगर धर्म पीठ नवनियुक्त महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांचे समाजातर्फे अभिनंदन🕉️
समाज शिक्षण,प्रबोधनातून समाज विकासाचे काम हाती घेतलेल्या धनगर धर्म पीठाने विदर्भात समाजातील सात्विक धार्मिक प्रवृत्तीच्या समाजबांधवांचे समाज विकासाकरीता संघटन सुरू केले आहे.नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विष्णूपंत गावडे यांनी सौ.शारदाताई ढोमने यांची धनगर धर्म पीठाच्या महिला राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती करुन समाजविकासात महिलांना सहभागी होण्याची सधी निर्माण केली.
सौ.शारदाताई ढोमने यांचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत असून दि.25नोव्हेंबर रोजी समाजनेते मा.आ.हरिदासजी भदे व युवानेते गोपाल गावंडे यांनी सौ.शारदाताई ढोमने यांचा सत्कार करून अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या या वेळेस श्री.ज्ञानेश्वरजी ढोमने, काशिनाथजी फुटाणे,अशोकरावजी ईसळ,लक्ष्मणराव खाडे,रमेशराव ढवळे,श्री.ढगे व समाजबांधव उपस्थित होते.
✍️विनायक काळदाते.