राणडुक्करांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी.

🐗राणडुक्करांनी पळवला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास.

दरवर्षी शेतकरी वनविभागाला व प्रशासनला राणडुक्करांचा अटकाव करण्या बद्दल विनंती करत असतात परंतु शेतकऱ्यांची ही मागणी संबंधित विभाग मनावरच घेत नाही व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टळल्या टळत नाही असे दिसून आले आहे.
यावर्षी सुद्धा मुर्तिजापूर तालुक्यात राणडुक्करांनी हैदोस घातला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
दोन दिवसांपूर्वीच येथील केद्रप्रमुख असलेले श्री.सरदार सर यांच्या शेतातील चार एकर तूर राणडुक्करांनी रात्रीतून फस्त करून शेतकऱ्याच्या तोंडचा घास पळवला आहे.
शासनाच्या संबधित विभागाने ह्या राणडुक्कराचा त्वरित बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करुन त्वरित नुकसानभरपाई दयावी अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *