
डॉ. प्रविण सहावे व डॉ. सौ.पुजा सहावे हे महाराष्ट्र राज्याच्या उप राजधानीचे शहर अध्यक्ष. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
डाॅ श्री प्रवीण सहावे व डाॅ पुजा सहावे यांची निवड अध्यक्ष धनगर धर्मपीठ नागपूर शहरा साठी करण्यात येत आहे. नागपूर हे सर्व धर्म चळवळीचे केंद्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर खूप महतवाची जबाबदारी धर्मपिठ महाराष्ट्रराज्य यांनी विश्वासाने टाकली आहे. .महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मधील प्रतिथयश डॉक्टर कुटुंब. डाॅ.प्रविण सहावे आणि डॉ. पुजा सहावे यांनी धर्म पीठाचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला आहे.रुग्ण सेवेतूनच समाजकार्य करणारे हे डॉ.दांम्पत्य त्यांच्या बायोडाटावरुन अखंड रुग्ण सेवा व अविरत समाजसेवा करत असते व नित्य काहीतरी आपल्या क्षेत्रात नविन शिकत असते.
अखंड उर्जेचा स्तोत्र मिळावा असे झपाटल्या सारखे काम करुन त्यांनी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे,आपले अस्तित्व निर्माण केले आहे.
डॉ. प्रविण सहावे यांना आपल्या उत्कृष्ट रुग्ण सेवेबद्दल 16पुरस्कार लाभले आहेत तर डॉ. पुजा यांना 4पुरस्कार लाभले आहेत.दोघेही राष्ट्रीय आणी आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये
सामिल होत असतात.
आपल्या अभ्युदय हाँस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी भारतात सौंदर्यशास्त्रात व पाईल्स उपचारांमध्ये लेसर टेक्नॉलॉजीचा नाविन्यपूर्ण उपयोग केला आहे.ते गरजवंताना अल्पदरात त गरिबांना मोफतसुद्धा सेवा देतात. आतापर्यंत त्यांनी विविध शिबिराच्या माध्यमातून 5000मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत.
त्यांची समाजासोबत सुद्धा घट्ट नाळ जुळलेली असून धनगर समाज युवक मंडळाने व धनगर वैद्यकीय संघटनांनी त्यांना समाजकार्यासाठी पुरस्कारीत केले आहे.डॉ. सहावे दाम्पत्य महिलाच्या विविध आजारासोबत सौदर्य शस्त्रक्रिया सुद्धा करते.तसेच भारतभर मुळव्याध मुक्ती अभियान राबवते.
त्यांचा टाईम्स ग्रुप,सकाळ मेडीया ग्रुपने सुद्धा वैद्यकीय व सामाजिक कामकाजासाठी गौरव केला आहे.केद्रीय मत्री मा.नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे.
वैद्यकीय सेवेलाच सामाजिक सेवेचे रुप देणाऱ्या सहावे दांम्पत्याचे कामकाज पाहून त्यांच्या कडून समाज शिक्षण, समाज प्रबोधन व समाजविकासाचे काम अजूनही चांगल्या पद्धतीने व्हावे ,त्याचा समाजाला फायदा व्हावा या हेतूने धनगर धर्म पीठ डॉ.प्रविण सहावे यांची धर्म पीठाचे नागपूर शहर अध्यक्ष पदी तर डॉ. पुजा सहावे यांची धर्म पीठ महिला आघाडीच्या नागपूर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करत आहे. त्यांचे वडील खूप धार्मिक आहेत. अध्यात्मीकता व धर्म याच्यावर त्यांचा खूप मोठा विश्वास आहे. धर्म, रूग्ण सेवा, साहित्य, हेच त्यांचे सत्कर्म आहे.सेवा परमो धर्म म्हणून काम करत आहेत.
डॉ. सौ व श्री.सहावे हे नक्कीच नागपूर शहरात धर्म पीठाचे नाव उज्ज्वल करतील व आणखी एक मानाचा तुरा शिरपेचात खोवून मान उचांवतील. या निवडीने नागपूर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे.
त्यांना समस्त धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य भक्तगणा तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
प्रकाशक:
श्री विनायक काळदाते.
प्रसिद्धी प्रमुख: सौ.रेषमा ठोंबरे☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️