
तरूण तडफदार व कर्तव्य दक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोमनाथ कर्णवर पाटील ठाणे भिवंडी व श्री रामचंद्र यमगर पिएसआय, आंतर राष्ट्रीय विमानतळ सहारा यांच्याशी साहित्य संमेलन आणि धर्म पीठ चर्चा 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️ मुंबई:बुधवार दिनांक 02/12/2020 रोजी सायंकाळी ठिक पाच वाजता हाॅटेल शेर ये पंजाब येथे छोटेखानी बैठक झाली. बैठक नियोजितच होती.कर्णवर घराण्याचे साहित्य संमेलनासाठी दिलेले योगदान कधीही फिटणारे नाहीत. फुकटचे सल्ले अनेक जण देतात. कार्यक्रमात मिरवून ओळख न दाखवनारे हजारो असतात.श्रीमंत लोक भरपूर आहेत. आयुष्य भर संपत्ती चे गाठोडे घेवून सांभाळत बसतात आणि आले तसे या भूतलावरून एक दिवस निघून ही जातात.धन श्रीमंती बरोबर जर मन श्रीमंती असेल आणि शूर असेल तर लोकांची सेवा करून तो लोकांच्या मनावर राज्य करतो. श्री सोमनाथ कर्णवर हे M.Sc.Agri आहेत. उच्च विद्या विभूषीत आहेत. नोकरीच्या खुर्चीत कधीही जात धर्म उच्च निच,गरीब श्रीमंत असे भेद करत नाही. ते एक कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत.तरीही जा जमातीत जन्म घेतला व जी जमात आजही सरकरी सवलती व सरकारी भागीदारी पासून कोसो दूर आहे त्या साठी त्यांच्या मनात खूप तळमळ आहे.ते प्रत्येक साहित्य संमेलन मध्ये स्वतः उपस्थित रहायले.तिसरे साहित्य संमेलन तर त्यांचे घरचेच होते.त्यांनी आज धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य यांच्या संदर्भात अनेक चांगले सुजाव मांडले. पश्चिम महाराष्ट्र विभागीय जबाबदारी घेतली आहे. दोन महिन्यात धर्म पीठ महाराष्ट्र राज्याच्या काना कोपर्यात पोहचवण्यासाठी त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. भविष्यात ही योगदान देत रहाणार व जमातीच्या विकासा साठी सदैव कटीबध्द रहाणार असे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर साहेब यांनी अश्वासन दिले. त्यांच्या बरोबर PSI,श्री रामचंद्र यमगर साहेब ही आले होते.त्यांनी ही त्यांचे मत मांडले व म्हणाले धनगर साहित्य संमेलन होणार आहे म्हणल्यानंतर आमचे ह्रदय अभिमानाने भरून आले होते. साहित्य संमेलनामुळे जी समाजाच्या इतिहासाची व राज्य तील समाजाच्या उंचावलेल्या प्रतिमेचे कौतुक केले. धर्म पीठ हे तर समाजाच्या अध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व एकतेच्या विकासाचा मैलाचा दगड असेल असे मत व्यक्त केले. आज पर्यंत धनगर जमातीने अनेक नेत्यांना पाठबळ दिले पण त्यांनी जमातीचा विकास व रचनात्मक कार्य केले नाही. पण काही ही नसताना साहित्य संमेलनामुळे खूप मोठे रचनात्मक कार्य चालू आहे. धर्म पीठ विकासात्क काम करेल व त्या साठी आम्ही सर्वतोपरी मदत करू. साहित्य संमेलन व धर्म पीठ या वैयक्तिक राहीले नसून या समाजाच्या संस्था झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी राज्यातील खरोखरच समाजाचे काम करणारे जे निरपेक्ष, सज्जन, परोपकार करणारे लोक एकत्र येणारच असा विश्वास ही व्यक्त केला.प्रशासन,साहित्य, धर्म, समाज कारण या क्षेत्रातील मान्यवरांनी या संस्थेत सक्रीय होऊन समाजाला दिशा देतील असे मत व्यक्त केले. या तरूण अधिकार्यानी अगदी तळमळीने मत मांडले. हे अधिकारी करणारे आहेत,फक्त बोलनारे नाहीत. त्यामुळे धर्म पीठ कार्याला खूप मोठी गती येणार हे नक्कीच.असे समाज धुरीन एकत्र येऊन राज्याला साहित्य, धर्म माध्यमातून दिशा देवू लागले तर समाजाला स्वकीय व परकीय फसवणार नाहीत योग्य दिशा मिळेल व समाज योग्य विकास दिशेने चालेल यात शंकाच नाही. लेखक:डाॅ.अभिमन्यु टकले.
संकलन, प्रसारण:श्री विनायक काळदाते
प्रसिद्धी प्रमुख:शंकर वीरकर धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️