धनगर धर्म पीठ संस्थापक अध्यक्ष डॉ.अभिमन्यू टकले  व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.विष्णूपंत गावडे यांचा सदिच्छा दौरा.

धनगर धर्म पीठ पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या संस्थापक आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी सदिच्छा भेटी घेतल्या. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯महाराष्ट्र राज्यात २०१८मध्येच बहुचर्चित धनगर धर्म पीठ स्थापन करण्यात आले आहे.परंतू कामकाज सप्टेंबर २०२०मध्ये सुरू झाले. संस्थापक अध्यक्ष डॉ अभिमन्यु टकले यांनी तीन च निवडी केल्या. केंद्रीय अध्यक्ष बापूसाहेब हटकर हे सामाजिक, राजकीय, धार्मिक लेखक, कवी,वक्ते,मार्गदर्शक आहेत. राज्य अध्यक्ष डॉ विष्णुपंत गावडे मानसोपचार तज्ज्ञ. श्री विनायक काळदाते बॅक मॅनेजर,समाज सेवक, (M.Sc Agri) आहेत. तसेच श्री विनायक काळदाते यांना अकोला जिल्हा संघटन, यशस्वी निवडणूक आमदारकी, झेडपी राजकारणाचा अनुभव आहे.मा.बापूसाहेब हटकर लिहतात, मा.डाॅ.विष्णूपंत गावडे समुपदेशन करतात,आणि मा. काळदाते साहेब संघटन करतात.आदिवासी धनगर साहित्य संमेलन व अनेक चळवळी व नेते डॉ अभिमन्यु टकले यांच्या विचारातून निर्माण झाल्यामुळे दोनच महिन्यात धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्याच्या जन सामान्य माणसात पोहचवण्याचे काम, जमातीच्या सज्जन लोकांनी केले आहेत. या मध्ये अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक, डाॅ.ईजिंनियर, वकिल, पोलीस अधिकारी, हभप, मठाधिश, संत लोकांनीच महत्वाची भूमीका घेवून धर्मपीठ जनमानसात पोहचवले आहे. धर्मपीठासाठी प्रसिध्दी प्रमुखाची गरजच पडली नाही.जमातीची खरोखर सेवा करणारे राजकिय पुढारीही खंबीरपणे पाठींशी उभे रहात आहेत.अशा या दोनच महिन्यात सुर्य उगवल्या नंतर प्रकाशाची पहाट व्हावी व अंधाराकडून प्रकाशाकडे या संताच्या व सज्जनांच्या संगतीत सर्व स्तरातील ज्ञानवंत लोकांचा ओढा सुरू झाला आहे.या बौद्धिक व सज्जन लोकांनीच साहित्य संमेलन यशस्वी केले आहे. हेच लोक समाजाला दिशा देवू शकतात. साहित्य संमेलने रचला पाया धर्म पीठ झालाशी कळस.म्हणजेच जमातीच्या साहित्य कांनी रचला पाया जमातीचे संत झालेच कळस.अशा या बहुचर्चित धर्म पीठाचे संस्थापक डॉ अभिमन्यु टकले. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ विष्णुपंत गावडे यांनी पदाधिकारी भेटी घेतल्या. पश्चिम महाराष्ट्र विभागीय धर्म गुरू मा.बबनराव बरकडे, हे M.com.LLB.आहेत.प्रशाकिय अधिकारी आहेत. खूप धार्मिक आहेत पहिली त्यांची भेट घेतली बरोबर श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाध्यक्ष धनगर धर्म पीठ सातारा हे होते.श्री बबन बरकडे व सजगने सर हे मनानी व आत्म्याने जोडली गेलेली माणस आहेत. सकाळी भेटी साठी मा.हनमंतराव चौरे तात्या येवून गेले.
जाताना कराड येथे हभप श्री आनंद बरकडे या तरूण समाजकल्याण अधिकार्याने उत्साहात स्वागत केले व सातारा धर्म गुरू पद कबूल केले. सातारा धर्मगुरू बीई प्राॅडक्शन ईजींनीयर व एमबीए आहेत. .पुढे कोल्हापुरात डाॅ संतोष कोळेकर यांनी करवीर नगरीत स्वागत केले. नविनच कार्य सुरू केलेले संदिप कारंडे यांनीही कार्य कर्तेसह येवून स्वागत केले. सर्वा चे म्हणने ऐकून घेतले.पुढे पट्टण कोडोलीत विठ्ठल बिरुदेव दर्शन केले प्रा. डाँ संतोष कोळेकर यांच्याशी चर्चा केली जेवण केले.पुढे श्री विजय हुबाले सांगली जिल्हाध्यक्ष व संजय हुबाले सांगली धर्म गुरू यांनी स्वागत केले व धर्म पीठ कार्य कारिणी नियुक्त केल्या व निवड पत्र दिले.श्री संजय हुबाले हे पदवीधर व किर्तनकार आहेत. तर विजय हुबाले हे पदवीधर असून श्री जयंत पाटील यांच्या निवडणूक प्रोजेक्ट चे मॅनेजर आहेत. ते दैनिक धनगर धर्म पीठ काढण्याच्या विचारात आहेत. अशा तर्हेने हाऊस फुल्ल भेटींचा व तिर्थ यात्रा कार्य क्रम संपन्न झाला.
संपादन:श्री विनायक काळदाते
प्रसिद्धी प्रमुख:श्री शंकर विरकर🕉️🕉️🕉️🕉️🕉️🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

कोल्हापूर, धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *