
मुर्तीजापुर शहरात मंगल कार्यालय करीत आहेत covid-19 च्या नियमाचे उल्लंघन लग्नसमारंभात हजारो लोकांची उपस्थिती
मुर्तीजापुर प्रतिनिधी
मूर्तिजापुर शहरातील आशीर्वाद नगर स्थित आशीर्वाद मंगल कार्यालयात मंगळवारी रात्रीचे लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते रात्रीच्यावेळी लग्न समारंभ पार पाडत असतांना हजारो लोकांचा समुदाय लग्न समारंभामध्ये उपस्थित होता covid-19 च्या नियमाचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी या नियमाचे पालन करावे लागते मात्र पैशावाल्यांचे लग्न समारंभ म्हटले की त्यांनी आपल्या मर्जीनुसार, आपल्या सोयीनुसार नियम धाब्यावर बसवून वाट मोकळी करायची ही जणू पद्धत झाली आहे मात्र गोरगरिबांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती करायची आणि पैसेवाल्यांनी नियम तोडायचे ही भुमिका घेतल्या जात आहे, अशा परिस्थितीत प्रशासनाने या बाबतीत कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे मोठ्या लोकांचे मंगल कार्यालय असल्यामुळे कोणत्याही नियमाचे पालन न करता बिनधास्तपणे हजार लोकांची उपस्थिती असताना कोणत्याही प्रकारचे नियमाचे पालन न करता शहरात कोरोना रोगाची लागण होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनावर असलेली जबाबदारी प्रशासन हात झटकत आहे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे प्रशासनासमोर प्रशासनाच्या डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे आणि इथे सामान्य लोकांना नियम शिकवले जातात सामान्य लोकांना नियम दाखवले जातात ही दुटप्पी भूमिका प्रशासनाने दूर करावी आणि covid-१९च्या नियमांचे पूर्णपणे पालन झाले पाहिजे जेणेकरून मुतिजापूर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही कोरोनाचा प्रसार होणार नाही आणि लोकांना कोणत्या प्रकारच्या रोगाची लागण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ५० लोकांची लग्नसमारंभात उपस्थितीची परवानगी असताना हजारो लोक मंगल कार्यालय मध्ये लग्न समारंभामध्ये उपस्थित राहतात ही गंभीर समस्या आहे, प्रशासन मात्र गप्प का अशा प्रकारचे प्रश्न सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडलेला आहे या गंभीर बाबीची दखल घेऊन प्रशासनाने मंगल कार्यालयावर कार्यवाही करण्यात यावी अशी लोकांकडून मागणी सुरू आहे अशा पद्धतीने covid-19 नियमांचे पालन होत नसेल तर प्रशासनाने तातडीने त्या ठिकाणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी जनतेमधून मागणीसुरू आहे