धनगर धर्म पीठ महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणून सौ.संगिताताई पाटील यांची निवड.

सौ.संगिताताई पाटील पदवीधर रणरागीणी उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ऋतस्य यथा प्रेत ——‘——————‘———-‘धर्म रक्षित रक्षित: –‘———————‘—-‘—‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️उत्तर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्याची काशी. अनेक धर्म ऐतिहासिक कार्याची भूमी.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राजकीय व धार्मिक कार्याची पावण भूमी. या अशा पावण भूमीत सौ.संगिताताई पाटील यांची उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य म्हणून निवड झालेली आहे. संगिताताईच्या निवडीने त्यांच्या कर्म भूमीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्या गुरू भक्त आहेत. त्यांची भक्ती त्यांना आणि सत्क्रुती धर्म पिठ साठी शक्ती म्हणून काम करेल हे मात्र निश्चित. सौ.संगिताताई पाटील यांचे धर्म पिठात स्वागत व त्यांचे अभिनंदन व शुभेच्छां.
समाजातील एकाहून एक कर्तृत्ववान महिला समाजविकासाच्या दृष्टीकोनातून पुढे येत आहेत व धर्म पीठाचा झेंडा खांद्यावर घेत आहेत.
नाशिक शहरातील धनगर समाजाची वाघिण म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या सौ.संगिताताई पाटील यांनी धर्म पीठाची पताका आपल्या हातात घेतली आहे.
🌹परिचय-सौ.संगिताताई पाटील ह्या पदवीधर असून मागील दहा बारा वर्षांपासून समाजसेवेत आहेत.त्या पूर्ण वेळ समाजसेवक आहेत. समाजसेवेसोबतच महिला व दिव्यांगासाठी काम करतात. दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकारी आहेत.त्यांचे पती पोलीस विभागात कार्यरत आहेत.सौ.संगिताताई पोलीस विभाग व समाजबांधवांमध्ये दुवा साधन्यात सुद्धा मदत करतात.नुकत्याच समाजातील शेतकरी बांधवाचा नियमबाह्य जमा करून घेतलेला ट्रॅक्टर त्यांच्या सहभागाने मुक्त झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील बानाई माता मंदिराजवळ ग्रामपंचायतने सुरू केलेले बांधकामाला स्थगिती मिळवण्यात त्यांनी सतत प्रयत्न करून परिसरात समाजबांधवाना मदत केली.समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी त्या समाजबांधवांसोबत खांदयाला खांदा लावून काम करतात. कलेक्टर आँफिस,पोलीस स्टेशनला निवेदने देण्यासाठी समाजबांधवांसोबत असतात. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधी म्हणून त्या बऱ्याच सांस्कृतिक कामकाजात सहभागी असतात.
सौ.संगिताताई पाटील यांची धर्म पीठावरील नेमणूकीमुळे नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात धर्म पीठाच्या कामकाजाला गती येण्यास मोठी मदत होणार आहे.

✍️ विनायक काळदाते
राज्य संघटक.

📚 रेश्मा ठोंबरे
प्रसिद्धी प्रमुख.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

धार्मिक, निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *