स्व.रमेश गावडे यांना धर्म पीठा कडून विनम्र श्रद्धांजली💐

दुःखद निदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐श्री रमेश गावडे, हे वीस वर्षांपासून समाज सेवा,राजकारणात सक्रिय कार्यकर्ते होते.रमेश गावडे रासपाचे खंदे कार्यकर्ते होते. श्री अर्जुन दादा सलगर यांनी रासपा सोडल्यानंतर ते त्यांच्या बरोबर काम करत होते. ते हिपळे, ता. दक्षिण सोलापूर येथे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच ही होते.ते एम आय एम पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष होते. 2014ला त्यांच्याच नेतृत्वाखालील उमेदवारांनी सोलापूर येथे 93000एवढे मतदान घेतले होते.2017 मध्ये त्यांच्या किडनी निकामी झाल्या होत्या तरीही 15 दिवसात डायलीसीस करून ते साहित्य संमेलन यशस्वी करण्या साठी काम करत होते. नंतर आज संध्याकाळपर्यंत हसत खेळत ग्रामपंचायत चे काम करत होते. डाॅ.विष्णूपंत गावडे,राज्य अध्यक्ष धनगर धर्मपीठ महाराष्ट्र राज्य यांचे खंदे समर्थक होते.ते धनगर धर्म पीठ सोलापूर शहर विभागाचे कार्य पहात होते .त्यांचे वय 40वर्षे होते. त्यांच्या अचानक जाण्याने दक्षिण सोलापूर शोककळा पसरली आहे.तसेच धनगर जमातीतील एक तारा निखळला आहे. समाजाचे खूप मोठ नुकसान झाले आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबाला दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. श्री विनायक जी काळदाते.राज्य संघटक धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

महाराष्ट्र, श्रद्धांजली, सोलापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *