धनगर धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांची कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाड्यांना भेट.

🕉️धनगर धर्म पिठ महिला राज्य अध्यक्षांची कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाड्यांना भेट🔯

कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाडे हे आपल्या समस्या साठी नेहमी चर्चेत असतात. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर सुद्धा डोंगर दऱ्यात असलेल्या या धनगरवाड्यांपर्यत रस्ता , विज , टेलिफोन, मोबाईल टावर पोहचले नाही किंवा आरोग्य सेवा नाहीत.प्रसुती दरम्यान उपचार न मिळाल्यामुळे मागील पंधरा दिवसापूर्वीच धनगरवाड्यावर एका माता व नवजात बालकाचे निधन झाले.मागील तिन चार महिन्यापूर्वी शाळेकरी मुलाला सर्पदंश झाल्यावर रस्ता व वाहन नसल्याने पालकांनी मुलाला डोंगर उतरून सहा किलोमीटर पायी चालत आणले व दवाखान्यात नेई पर्यंत तो मुलगा दगावला.
धनगर धर्म पिठ महिला आघाडी राज्य अध्यक्षा सौ.शारदाताई ढोमने ह्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी सांगली,कोल्हापूर,सातारा येथील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.धर्म पीठ संस्थापक अध्यक्ष डॉ. टकले साहेबांच्या सुचनेनुसार त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील समस्या ग्रस्त धनगरवाड्यांना सुद्धा भेटी दिल्यात. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री.संजयजी वाघमोडे यांच्या सहकार्याने हा धनगरवाड्यांना भेटीचा कार्यक्रम घडून आला.

धर्म पीठ महिला अध्यक्षांनी धनगरवाड्यावरील महिला व एकूण सर्वच नागरिकांसोबत संवाद साधून तेथील प्रश्न समजून घेतले.धनगरवाड्यांवर प्राथमिक आरोग्य सेवेची समस्या फारच बिकट असल्याचे त्यांच्या लक्षात आले.जवळपास कुठेही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत किंवा दवाखान्यात जाण्यासाठी रस्ता व वाहन नाहीत.गर्भवती महिला व नवजात बालकांना सहा महिने झाल्यावर सुद्धा अजून कुठलेही लसीकरण झालेले नाही.108 वर अँम्बूलन्स सेवा मागवायची तर टेलिफोन किंवा मोबाईल नाहीत. झोळी करून,पाच सहा किलोमीटर जंगल तुडवत पेशंट रस्त्यावर आणावा लागतो मग कुठे वाहन शोधावे लागते.तेथून आरोग्य सुविधा पंचवीस किलोमीटरवर आहेत. पेशंट तसेच गर्भवती महिला व नवजात बालकांच्या कुपोषणाचा व वैद्यकीय सुविधांचा मोठा प्रश्न असल्याचे त्यांना दिसून आले.

धनगरवाडे जंगलात असल्यामुळे नेहमीच जंगली प्राण्यांच्या हल्ल्याची भिती असते, हे जंगली प्राणी नेहमी शेळ्या मेंढ्या पळवतात, त्यांची नुकसानभरपाई सुद्धा तिन चार वर्षापासून वनविभागाकडून मिळत नाही. संध्याकाळी सहा नंतर जंगली प्राणी घराजवळ येतात तेव्हा रहिवाशांना जिव मुठीत धरून जगावे लागते.
धनगरवाड्यांवर रोजगाराची समस्या फार मोठी असून लहान लहान शेतीच्या तुकड्यांवर व पशुपालनावर हे रहिवासी आपला प्रपंच चालवत असतात.अनेक पिढ्यांपासून जमीन कसतात परंतु ती सुद्धा त्यांच्या नावावर नाही. तेथेही वनविभाग दरवर्षी पेरलेले मोडून टाकणे,जनावरे जप्त करणे,माणसांना मारहाण करणे,खोट्या केसेस दाखल करणे या प्रकारे त्रास देत असते.वनविभागाच्या लेखी जंगली प्राण्यांचे महत्त्व आहे परंतु माणसाला महत्त्व नाही असे चित्र आहे.
धर्म पीठ महिला अध्यक्षांच्या या भेटीनंतर धर्म पीठ धनगरवाड्यांवर आरोग्य, शिक्षण,रस्ता, फिरती आरोग्य सेवा, आरोग्य शिबिरे,रोजगार इत्यादी प्रश्नांवर स्थानिक प्रशासन व सरकार दरबारी निवेदन देणार आहे तसेच स्वयंसेवकांमार्फत आरोग्य शिबीर किंवा तपासणी मोहीम हाती घेता येईल का ही शक्यता सुद्धा तपासून पाहणार आहे.

धर्म पीठाच्या महिला अध्यक्षांच्या भेटीमुळे धनगरवाड्यावरील महिलांना व इतर नागरिकांना फार बरे वाटले व ,समाज आपल्या बरोबर असल्याचा त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला.

✍️विनायक काळदाते.
राज्य संघटक.
📚रेश्मा ठोबरे
प्रसिद्धी प्रमुख.

कोल्हापूर, महत्वाची बातमी

One thought on “धनगर धर्म पिठ महिला राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांची कोल्हापूर जिल्ह्यातील धनगरवाड्यांना भेट.

  1. सौ. शारदा वहीनी आपण कोल्हापुर येथील धनगर वाड्यांना भेट देऊन समाजाची काय परिस्थिती आहे हे जाणुन घेतली त्याब ध्दल आपले अभिनंदन .ही परिस्थिती आम्ही धनगर वाडा ही फिल्म रिलीज होण्यापूर्वी बघीतली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *