
🕉️धर्म पिठ उ.म.प्रदेशाध्यक्ष सौ.संगिताताई पाटील यांचा विविध धार्मिक संस्थाकडून सत्कार🕉️
धर्मो रक्षिती रक्षिता या उक्ती ला अनुसरून धनगर धर्म पिठाची उत्तर महाराष्ट्राची धुरा खांद्यावर घेतलेल्या सौ.संगिताताई पाटील यांनी धर्म पिठ संस्थापक अध्यक्ष डॉ. टकले साहेबांच्या धोरणानुसार उत्तर महाराष्ट्रातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देत आपला प्रथम दौरा पूर्ण केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या व होळकर साम्राज्याची काही काळ राजधानी असलेल्या चांदवड नगरीतील रेणुका माता मंदिराला भेट देवून समाजाच्या श्रद्धा स्थानांची परिस्थिती समजून घेतली. चांदवडचे श्री.रेणुकामाता मंदिर तसेच येथील रंगमहाल हे होळकर संस्थान अंतर्गतच आहेत.समाजाच्या हातातून निसटून गेलेली ही श्रद्धास्थाने समाजाने पुन्हा आपल्या अखत्यारीत घ्यावीत व आपल्या दैदिप्यमान इतिहासाची जपणूक करावी अशी समाजाची भावना आहे. या कामी धर्म पिठाचे मार्गदर्शक माजी तहसीलदार आर.पि.कुवर साहेबांच्या व धर्म पिठ जिल्हा अध्यक्ष खंडेरावजी पाटील यांच्या सल्ल्याने समाज आगेकूच करणार आहे. वरील पार्श्वभूमीवर सौ.संगिताताई पाटील यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे.
आपल्या दौऱ्यात महिला प्रदेशाध्यक्षांनी धुळे येथील स्वामिनारायण मंदिर तसेच एकविरा देवी संस्थानला भेट दिली.
धर्म पिठाची स्थापना झाल्याबद्दल सर्वच धार्मिक संस्थांनी आनंद व्यक्त केला तसेच धर्म पिठाच्या पदाधिकारी म्हणून एकविरादेवी संस्थान धुळे यांनी सौ.संगिताताई पाटील यांचा सत्कार केला.
✍️विनायक काळदाते.
रेश्मा ठोंबरे.
धनगर धर्म पिठ