खापरवाडा गावात अवैध दारु विक्री बंद करा नाहीतर उपोषणाला बसणार.-सरपंच सौ.शुभांगी सरोदे.

🥃🍷खापरवाडा गावात अवैध देशी दारू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा शुभांगी सरोदे सरपंच आमरण उपोषण करणार.

मुर्तीजापुर प्रतिनिधी
मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा गावच्या सरपंच शुभांगी सरोदे यांनी गावातील अवैद्य देशी दारू बंद करण्यात यावी यासाठी वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती अर्ज केले मात्र गेल्या दोन वर्षापासून विनंती अर्ज करूनही माना पोलीस प्रशासन गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यात अपयशी ठरलेले आहे त्यामुळे गावातील देशी दारू बंद करण्यात यावी यासाठी खापरवाडा सरपंच शुभांगी सरोदे यांनी आमरण उपोषण करण्याचे पत्र दिले आहे आणि त्या पत्रात असे म्हटले आहे की गावात अवैध दारूची राजरोसपणे विक्री सुरू आहे त्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे बऱ्याच कुटुंबात कलह निर्माण होऊन घरातील ज्येष्ठ पुरुषांना ,महिलांना तसेच लहान मुलांना त्याची झळ पोहोचत आहे आम्ही जवळपास दोन ते तीन वर्षापासून आपल्या सोबत पत्रव्यवहार करीत आहो तसेच स्वतः भेटून चर्चा केलेली आहे आपण कार्यवाही करताना दिसतात मात्र कारवाई मध्ये निष्पणं होताना दिसत नाही काही दिवसानंतर पुन्हा गावांमध्ये अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू होते आणि त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी समजायला मार्ग राहिलेला नाही त्यामुळे नाईलाजास्तव नवीन वर्षात 2021 मध्ये आमच्या गावात अवैध दारू विक्री सुरू राहिल्यास स्वतः शुभांगी नारायण सरोदे सरपंच खापरवाडा गावात आमरण उपोषण सुरू करणार आहे त्याबाबत पोलीस स्टेशन माना यांना एक विनंती पत्र त्यांनी दिलेला आहे त्यानंतर त्याच्या प्रती. मा. जिल्हाधिकारी अकोला अकोला , पोलीस अधीक्षक अकोला, उपविभागीय अधिकारी मुर्तीजापुर यांना देण्यात आल्या आहेत समस्त गावातील लोकांची मागणी गावातील अवैध दारू बंद करण्यात यावी म्हणून मात्र पोलीस प्रशासन या गोष्टीकडे डोळेझाकपण करीत आहे.या नविन वर्षाच्या सुरुवातीला गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी अन्यथा सरपंच खापरवाडा हया आमरण उपोषणाला बसणार असा इशारा दिला आहे

मुर्तीजापूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *