
मा. प्रा.राम शिंदे साहेब माजी कॅबिनेट मंत्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
मा.प्रा.राम शिंदे साहेबांचा वाढदिवस. मा.राम शिंदे साहेब हे चौंडी ता.जामखेड जि.अहमदनगर येथील ऐतिहासिक स्थळाचे रहिवाशी. जा ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या खेळल्या, बागडल्या त्या पवित्र भूमीतच शिंदे साहेब खेळले बागडले. चौंडी हे एक ऐतिहासिक खंडहार होते. पण कालांतराने या गावानेही विकासाचा कात टाकला. प्रा. राम शिंदे गरिब शेतकरी कुटुंबात जन्माला आले. कोणताही राजकीय वारसा नव्हता. पण ग्राम पंचायत पासून ते आमदारकी पर्यंत सर्व निवडणूक लढवल्या. आमदार ही झाले. पुण्यश्लोक अहिल्याबाईहोळकर यांच्या जन्म स्थानचा बहुमान राखला. शिंदे साहेबांचे राजकीय वर्चस्व वाढत होते.ते ग्रह राज्यमंत्री झाले. नंतर कॅबिनेट मध्ये वर्णी लागली. धनगर जमातीचे वर्चस्व वाढू लागले. शिंदे साहेब प्रत्येक कार्य कर्त्याच्या हाकेला महाराष्ट्र भर उपस्थित रहात होते.सतत सर्वाना सहकार्य करत होते.सोलापूर विद्यापीठ नामांतर असो कि साहित्य संमेलन चळवळ असो कि आरक्षण प्रश्न असो शिंदे साहेब पुर्ण सहकार्य करत असत. सोलापूर विद्यापीठ नामांतर घोषणा पहिल्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात केली आणि नामांतर ही केले. हा गेल्या सत्तर वर्षानंतर चा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात समाज चळवळी बरोबर शिंदे साहेबांचा वाटा ही मोठा आहे.
नंतर सर्वात मोठा निर्णय धनगर जमातीला एक हजार कोटींच्या आदिवासींच्या सवलती ची घोषणा करून घेणेचे महत्त्वाचे काम केले होते.पण नंतर त्यांचे सरकार गेले आणि धनगर जमातीच्या तोडांला पाने पुसली गेली. परिवर्तन हा निसर्ग नियम असला तरी धनगर जमातीचा एक माणूस पुढे गेला .आज विद्यापीठ नामांतर झाले,आदिवासी सवलती मिळाल्या, उद्या समाज संघटीत झाला तर आपली राजकीय आणि साखर कारखानदारीचे काय ? हे देवेंद्रजीच्या जवळचे आणि हे स्वर्गीय गोपीनाथ जी मुंढे गटाचे.सतत अहमदनगरवर घराणेशाहीचे राज्य. त्यांना वाईट वाटू लागले. हे सगळे एक झाले. असे एक ना अनेक घटक एकत्र आले आणि सर्व ताकद लावून स्वकीय व परकीयांनी राजकीय पराभव केला. मी जा जा वेळेस शिंदेसाहेबाना भेटलो त्या वेळेस ते म्हणत ही राजकीय पदे आज असतात उद्या नसतात रात्रीत बदलतात. माणुस की खूप महत्वाची आहे.त्यामुळे शिंदे साहेबांचा राजकीय पराभव झाला असला तरीही त्यांचा माणसीक सामाजिक पराभव कोणीही करू शकत नाही.ते आपल्या तरूणासाठी नक्कीच आदर्श आहेत .त्यांची अशिच प्रगती होत रहावो. त्यांना शतायुष लाभो. आप जीवो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार. मा.प्रा.राम शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
धनगर धर्म पिठ व आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य 🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹