💐धर्म पिठाने नववर्षाला केला विद्वजनांचा सत्कार.

🕉️धर्म पिठाने केला शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान🕉️
अकोला- समाज शिक्षण,प्रबोधन व विकास साधत समाजाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे धैय्य व उद्दिष्ट असलेल्या धर्म पिठाने आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विधायक कामात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
🌹पतंजली योगपिठाने नुकताच योग शिक्षक हा किताब बहाल केलेले श्री.राजेश दिवनाले सर यांचा छोटेखानी सत्कार तसेच आध्यात्मिक क्षेत्रात योगदान देणारे ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब यांचे धर्म पिठाचे जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती पत्र प्रदान व सत्कार कार्यक्रम मा.आ.हरिदासजी भदे व विदर्भ धर्म गुरु ह.भ.प.प्रभाकररावजी दिवनाले यांच्या हस्ते पार पडला.
या प्रसंगी ह.भ.प.दिवनाले महाराज यांनी धर्म पिठाचा उद्देश, धोरणे व गरज प्रस्तुत केली. भरकटलेल्या समाजाला माणसिक शांती व समाधान मिळण्यासाठी आध्यात्मिकतेची जोड आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला मा.आ.हरिदासजी भदे,ह.भ.प.दिवनाले महाराज,मा.नारायणजी ढवळे सर,श्री.रामहरी अघडते सर, श्री.गोपालभाऊ गावंडे,श्री.अनिल पातुर्डे सर,श्री.मनोज करणकार,सचिन बचे,सुनील दिवनाले,अभिषेक नवलकार, विकी नागे व समाजबांधव उपस्थित होते.
मा.आ.हरिदासजी भदे साहेबांनी उपस्थितीताना पुष्पगुच्छ देवून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
दुसऱ्या एका कार्यक्रमात गजानन महाराज यांची नवीन स्वरूपात पोथी लिहिणाऱ्या साहित्यिक सौ.विद्याताई बनाफर यांचा तसेच कोविद-19 काळात जिवाची पर्वा न बाळगता वैद्यकीय सेवा देणाऱ्या ह.भ.प.सौ.संगीताताई जोध यांचा धर्म पिठा तर्फे प्रभाकररावजी दिवनाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे नियोजन श्री.गोपालभाऊ गावंडे यांनी केले.
धर्म पिठाच्या या सत्कार सोहळ्यांमुळे धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे मनोबल वाढून त्यांना समाजकार्यात प्रेरणा मिळेल अशी चर्चा सर्वत्र आहे.
✍️विनायक काळदाते.

🕉️🌹🕉️🌹🕉️🌹🕉️🌹

अकोला, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *