
🕉️धर्म पिठाचे विदर्भातील संघटन तरुणाई कडे-गोपालभाऊ गावंडे यांची विदर्भ संघटक पदी निवड🕉️
मुर्तिजापूर
जगात भारताचा तरुणांचा देश म्हणून उल्लेख होतो कारण ईतर देशांच्या तुलनेत लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण भारतात ज्यास्त आहे.ज्या देशात तरुणांची संख्या ज्यास्त त्यांची विकासाची,प्रगतीची शक्यता ज्यास्त असा जगाचा नियम आहे.जगातील विविध संघटना,आँरगनायझेशन यांचा सुद्धा तरुणांना प्राधान्य देण्याचे धोरण आहे.
समाज प्रबोधन, शिक्षण व संघटनातून समाज विकास साधन्याचे धैय्य असलेल्या धर्मपिठामध्ये स्त्री शक्तीने जसे आपले स्थान निर्माण केले आहे त्याच पद्धतीने तरुणांचा सहभाग सुद्धा वाढावा या उद्देशाने उर्जावान व कृतीशील तरुणांनी पुढे येउन धर्म पिठाचा झेंडा खांद्यावर घ्यावा या उद्देशाने विदर्भातील अकोल्याचे तरुण समाज कार्यकर्ते श्री.गोपाळभाऊ गावंडे यांची विदर्भ संघटक म्हणून निवड संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी धर्म गुरु प्रभाकर दिवनाले महाराज व विदर्भ अध्यक्ष विनायक काळदाते यांच्या शिफारशी वरुन केली.
🌹परिचय-श्री.गोपालभाऊ गावंडे हे पदवीधर बांधकाम व्यावसायिक असून मागील दहा पंधरा वर्षापासून समाजकार्यात अग्रेसर आहेत.उत्कृष्ट संघटक असलेल्या गोपालभाऊ यांचा चांगला जनसंपर्क असून त्यामाध्यमातून धर्म पिठाचे काम प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी मदत होणार आहे.
✍️प्रा.एल.डी.सरोदे
धर्म पिठ प्रसिद्धी प्रमुख.